
पुणे : ‘खंडेराया देवराया.. थाटून आलास नळदुर्गाला, घेऊन जाया बानुबया... बानुबया... बानुबया...बानुबया...’ नवजवान मित्रमंडळाच्या खंडोबा-बानू विवाह सोहळा या जिवंत देखाव्यात लागलेलं गाणं अन देखावा पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांनी त्यावर धरलेला ठेका, सोबत टाळ्या अन शिट्ट्यांची साथ. अशा उत्साही वातावरणात गणेशभक्तांनी गणेश दर्शनासह देखावे पाहण्याचा आनंद रविवारी लुटला.