
तळेगाव स्टेशन : मावळचे माजी आमदार कृष्णराव धोंडिबा भेगडे यांच्यावर तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत मंगळवारी (ता.०१) दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुतणे आनंद भेगडे यांनी त्यांच्या पार्थिवास मुखाग्नी दिला. मावळच्या सर्वांगीण विकासाचा अभ्यासू शिल्पकार हरपल्याची भावना अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केली.