लोणी, उरुळी परिसरात कोरोनाचा उद्रेक 

जनार्दन दांडगे
Saturday, 8 August 2020

पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, थेऊर, कदमवाकवस्ती, आळंदी म्हातोबाची व सोरतापवाडी या प्रमुख ग्रामपंचायत हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चारशेवर पोचली आहे.

लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीमधील कदमवाकवस्ती (९), लोणी काळभोर (५), उरुळी कांचन (५), थेऊर (३), आळंदी म्हातोबाची (१) व सोरतापवाडी (१) या सहा ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (ता. ८) दिवसभरात कोरोनाचे आणखी २४ रुग्ण आढळून आले आहेत. पूर्व हवेलीत कोरोनाचा उद्रेक पूर्वीप्रमाणे सुरुच आहे. 

पोलिस बनून हाॅटेलमध्ये शिरले, जेवले अन्...

पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी, थेऊर, कदमवाकवस्ती, आळंदी म्हातोबाची व सोरतापवाडी या प्रमुख ग्रामपंचायत हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चारशेवर पोचली आहे. त्यातील शंभरहून अधिक रुग्ण सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागिल बारा दिवसांच्या कालावधीत पूर्व हवेलीत दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. 

दौंडमध्ये म्हशीला झालं जुळं

लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी सांगितले की, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊर, आळंदी म्हातोबाची व सोरतापवाडी या सहा ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी दिवसभरात कोरोनाचे २४ नवीण रुग्ण आढळून आले आहेत. मागिल काही दिवसाच्या तुलनेत पूर्व हवेलीत मागिल चार ते पाच दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असले, तरी रुग्ण वाढ होतच आहे. नागरिक जोपर्यंत काळजी घेत नाहीत, तोपर्यंत कोरोना आटोक्यात येऊ शकणार नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Further increase in the number of corona patients in Haveli taluka