भक्तिमय वातावरणात गणेश जयंती साजरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग मंडळ आणि केसरीवाडा मंडळ या मानाच्या पाच गणपतींची पारंपरिक पद्धतीत यज्ञ व आरती करून गणेश जयंती साजरी करण्यात आली. या वेळी पुणेकरांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरात भजन व कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे - कीर्तन, भजन, होम आदी धार्मिक कार्यक्रमांनी मंगळवारी शहरात गणेश जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मंदिरांवर विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग मंडळ आणि केसरीवाडा मंडळ या मानाच्या पाच गणपतींची पारंपरिक पद्धतीत यज्ञ व आरती करून गणेश जयंती साजरी करण्यात आली. या वेळी पुणेकरांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरात भजन व कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

कोरोना व्हायरसचे दोन संशयित पुण्यात; नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल

श्रीमंत दगडूशेठ मंदिरात आयोजित सोहळ्यामध्ये शारदा गोडसे, संगीता रासने, ज्योती सूर्यवंशी यांच्या हस्ते गणेशपूजन झाले. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, सुनील रासने, महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. मंगळवारी पहाटे चार ते सकाळी सहा या वेळेत गायिका आर्या आंबेकर यांनी श्रींच्या चरणी स्वराभिषेक अर्पण केला. शास्त्रीय गायनासह भक्तिगीते ऐकण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळाली. श्री देवदेवेश्वर संस्थेतर्फे मंदिराच्या परिसरात सायंकाळी पं. उपेंद्र भट यांचे गायन व मंगला गोडबोले यांचा ‘पु. ल. एक जीवनदृष्टी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पुणे : बायको घ्यायची संशय; नवऱ्याने मागितला घटस्फोट अन्...

कसबा गणपतीची ग्रामप्रदक्षिणा
मानाचा पहिला गणपती कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त ग्रामप्रदक्षिणा झाली. गणेशपूजनानंतर प्रदक्षिणेला सुरुवात 
करण्यात आली. 

संघर्ष आणि शिववर्धन ढोल पथके; तसेच प्रभात बॅंड प्रदक्षिणेत सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्य आणि बाप्पाच्या जयघोषात काढण्यात आलेल्या या प्रदक्षिणेमुळे कसबा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. कसबा परिसरात पीएमपी बसेसची विनाअपघात सेवा पुरविणाऱ्या जनार्दन पाटील, आजिनाथ विधाते, सुनील शिंदे, गणेश बारवकर व तुषार सस्ते हे वाहक; तर दिलीप तोडकर, बाळासाहेब कानगुडे, अमृता माळी, संतोष कदम व विष्णू बुक्तर या चालक-वाहकांचा सत्कार करण्यात आला. 

पीएमपीच्या चालक व वाहकांनी या वेळी श्री कसबा गणपतीची मूर्ती पालखीत ठेवली. पालखीचे भोई होण्याचा मान त्यांना देण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, पीएमटी कामगार संघाचे (इंटक) अध्यक्ष राजेंद्र खराडे, नगरसेवक भोसले उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Birth Anniversary Celebration