
पुणे : येत्या बुधवारपासून (ता.२७) गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि उपनगरांतील बाजारपेठा खरेदीदारांनी गजबजून गेल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर दोन दिवस साप्ताहिक सुट्टी आल्याने शनिवारी सकाळपासूनच प्रमुख व्यापारी गल्लीबोळात विविध साहित्य खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये उत्साह होता.