पुणतांबे ता 12 B-2 (पेंडीग महत्वाची बातमी. ) बलशाली भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी तरुणांनी पुढे यावे. राजेश परजणे,.अध्यक्ष गोदावरी दुध संघ.

पुणतांबे ता 12 B-2  (पेंडीग महत्वाची बातमी. )  बलशाली भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी तरुणांनी पुढे यावे. राजेश परजणे,.अध्यक्ष गोदावरी दुध संघ.
Published on: 

फोटो आलेला नाही
पुणतांबे (ता. राहाता) ः उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळांना पारितोषिकांचे वितरण करताना शिवाजीराव कपाळे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे.

तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे ः परजणे
पुणतांबे, ता. १२ ः गणेश विसर्जन मिरवणुकीतील देखावे हे एकात्मतेचे दर्शन घडवितात. बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुण पिढीने पुढे यावे. आज निर्व्यसनी समाजाची गरज आहे. गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केले.
गोदावरी प्रतिष्ठानतर्फे विसर्जन मिरवणुकीत उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळांना पारितोषिके देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी साई आदर्श मल्टिस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे होते. त्यांच्या हस्ते विसर्जन मिरवणुकीत उत्कृष्ट देखावे सादर केलेल्या गणेश मंडळांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. शिवाजी तरुण मंडळाने प्रथम क्रमांक, एकता तरुण मंडळ व मित्र विहार गणेश मंडळांना विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला, तर अचानक तरुण मंडळाला तृतीय क्रमांक घोषित करण्यात आला. गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय धनवटे यांनी प्रास्ताविक केले. कपाळे म्हणाले की, साई मल्टिस्टेट संस्थेमार्फत दरवर्षी विजेत्या गणेश मंडळांना बक्षिसे दिली जातात. गणेश मंडळांनी उत्तम देखावे सादर केले, याचा अभिमान वाटतो.
शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुहास वहाडणे, शेतकरी सेनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, माजी सरपंच सुधाकर जाधव, भागवतराव धनवटे, मंदिर समिती अध्यक्ष शिवा प्रधान, दत्ता धनवटे आदी मान्यवर उपस्थित होते. रवींद्र जेजूरकर यांनी सूत्रसंचालन केले. विशाल चव्हाण यांनी आभार मानले. चंद्रभान जोरवेकर यांनी परीक्षण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com