
पुणे : पारंपरिक ढोल-ताशांचा गजर...ठेका धरायला लावणारा ताल...मन मोहून टाकणाऱ्या रांगोळीच्या पायघड्या...फुलांची आकर्षक सजावट...अन् ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने अवघे उपनगर दुमदुमून गेले. बुद्धीची देवता, चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचे आज मंगलमय वातावरणात आगमन झाल्याने चैतन्यमयी आनंदपर्वाची सुरुवात झाली.