esakal | 'एक गाव, एक गणपती' पंरपरा असलेल्या रांजणगावात यंदा गणेशोत्सव व द्वारयात्रा कोरोनामुळे रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Bhadrapad Ganesh Utsav and Dwarayatra in Ranjangaon canceled due to corona

अष्टविनायक महागणपतीच्या मंदिरात होणारा दिमाखदार पारंपरिक भाद्रपद गणेशोत्सवातील सोहळा कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी देवस्थान ट्रस्टला दिले आहे. 

'एक गाव, एक गणपती' पंरपरा असलेल्या रांजणगावात यंदा गणेशोत्सव व द्वारयात्रा कोरोनामुळे रद्द

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तळेगाव ढमढेरे : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे  प्रतिवर्षाप्रमाणे आज पासून (२०) ते  मंगळवार (ता.२५)  या कालावधीत होणारा भाद्रपद गणेशोत्सवव 'श्रीं' ची मुक्तव्दार यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. यामुळे या कालावधीत हाताने स्पर्श करून महागणपतीचे मुक्तव्दार दर्शन व  देवाला जलाभिषेक बंद असणार आहे. तसेच पालखी सोहळाही रद्द करण्यात आलेला आहे. या काळात होणारे व्दारयात्रा, भाविकांची दंडवते, कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अष्टविनायक महागणपतीच्या मंदिरात होणारा दिमाखदार पारंपरिक भाद्रपद गणेशोत्सवातील सोहळा कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी देवस्थान ट्रस्टला दिले आहे. 

"द्वारयात्रा व पालखी सोहळ्याची परंपरा खंडित"- 
रांजणगाव गणपती येथे गेली अनेक वर्षापासून "एक गाव, एक गणपती" अशी परंपरा चालू आहे. भाद्रपद गणेशोत्सव काळात चार दिशांना असलेल्या महागणपतीच्या बहिणींना आणण्यासाठी श्रीची पालखी जाते. यामध्ये तालुक्यातील करडे, निमगाव म्हाळुंगी, गणेगाव व ढोकसांगवी या चार गावात रांजणगाव येथील नागरिक अनवाणी चार दिवस द्वारयात्रा काढतात. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे हे सर्व धार्मिक कार्यक्रम शासनाने रद्द केल्याने रांजणगाव ग्रामस्थांची द्वारयात्रेची परंपरा खंडित झाली आहे. 

'पीएमपी'साठी महापौर मोहोळ घेणार पुढाकार; बससेवा लवकर सुरू होण्याची शक्यता!

''३१ ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे शासनाच्या नियमानुसार महागणपतीचे मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याचे श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रष्ट तर्फे सांगण्यात आले आहे. मात्र, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे गणेश भक्तांसाठी ऑनलाईन दर्शन सुविधा 'शेमारो भक्ती' या अॅपवर महागणपती लाईव्ह दर्शन सेवा सुरु असल्याचे ट्रष्टने कळविले आहे.''

पुणेकरांच्या विरोधापुढे महापालिका झुकली; 'ते' बहुचर्चित टेंडर केलं रद्द!​

loading image
go to top