esakal | काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पूर्व हवेलीकरांची लगबग सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

pune

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पूर्व हवेलीकरांची लगबग सुरू

sakal_logo
By
जनार्दन दांडगे.

उरुळी कांचन : गणेशाचे आगमन आठ दिवसांवर आल्याने पूर्व हवेलीतील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी उरुळी कांचन व लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत दुकाने थाटू लागली असल्याचे चित्र सध्या या दोन्ही बाजारपेठेत पहायला मिळत आहे. लोणी काळभोर व उरुळी कांचन येथील ग्रामपंचायत हद्दीतील विविध भागामध्ये तसेच पुणे- सोलापूर महामार्गाच्या बाजूला वेगवेगळ्या भागात गणेशमूर्तीची दुकाने थाटली गेली आहेत. तसेच गणरायाचे स्टॉल लागलेले आहेत. गणरायासाठी आवश्यक असलेल्या आरास साहित्याची दुकाने सजली आहेत. सर्वाचा लाडका बाप्पा वाजतगाजत घराघरांत, तसेच सार्वजनिक मंडळात शुक्रवारी विराजमान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पूर्व हवेलीतील सर्वच ठिकाणी जय्यत तयारी सुरू झाल्याची लगबग पहायला मिळत आहे. (Pune News)

गणेशोत्सवानिमित्त खरेदीने वेग पकडला असून मूर्ती खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी नागरिक व लहान मुले स्टॉलवर गर्दी करताना दिसून येत आहे. सिंहासनावर आरूढ, कमळावर बसलेला, बाल गणेश, पंचागकर्ता, अशा गणरायांच्या विविध रूपांनी अवघा रंग एकच झाल्याची अनुभूती बाजारपेठेत फेरफटका मारल्यावर मिळत आहे. बाप्पाच्या आगमनाला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना बाजारपेठेत गणरायाची मूर्ती निश्चित करण्यापासून ते सजावटीचे साहित्य खरेदी करण्यापर्यंत भक्तांची गर्दी झाली आहे. पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाकडे कल वाढल्याने शाडू मातीच्या मूर्तीची मागणी वाढली आहे. कोरोनामुळे मागील वर्षीही गणेशोत्सव साजरा करण्यात आला नव्हता. मात्र, त्याचा परिणाम भक्तांच्या उत्साहावर झाला नाही.

हेही वाचा: Paralympics : मूर्ती लहान पण किर्ती महान; कृष्णाला सुवर्ण

दरम्यान, स्वस्तात, विद्युत रोषणाई असल्याने बाजारात चायना मालाला मागणी वाढली आहे. परंतु, बाजारात इंडियन माल मोठ्या प्रमाणावर असल्याने यंदा साहित्यांचे दर वाढले आहेत. घरगुती गणपतीसाठी कमी प्रमाणात साहित्य खरेदी केले जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सार्वजनिक उत्सव साजरा होत नसल्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. बाजारात किरकोळ प्रमाणात ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. त्यावर विक्रेत्यांचा उदरनिर्वाह चालू असल्याने पुन्हा निर्बंध लावू नयेत, अशी मागणी व्यावसायिक करीत आहेत.

हेही वाचा: केंद्र सरकारचा मोठा दिलासा, 39 गोळ्यांचं दर केले कमी

विविध रूपांत गणेशमूर्तीमूर्ती

सजावटीत कलाकारांनी आकर्षकता आणली आहे. लालबागचा राजा, सिद्धिविनायक, दागिना गणपती, पेशवे बैठक, सावकार बैठक, दगडूशेठ आदी रूपांत मूर्ती आहेत. लालबागचा राजा आणि बाल गणेश या मूर्तीला विशेष मागणी आहे. विद्युत रोषणाईत थ्रीडी इफेक्ट दाखविणारे रंगीत तलम कपडय़ावरील चमकीचे सोवळे मूर्तीना परिधान करण्यात आले. याबाबत लोणी काळभोर येथील सचिन अडागळे म्हणाले," गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी नागरिक व लहान मुले स्टॉलवर गर्दी करत आहेत. घरगुती बाप्पांसाठी सेट लावले आहेत त्याला गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे.

loading image
go to top