पॅरिसमध्ये यंदा रथयात्रेविना गणेशोत्सव

गणपतीची आरती गाण्यासाठी नटूनथटून आलेल्या मराठमोळ्या बालिका.
गणपतीची आरती गाण्यासाठी नटूनथटून आलेल्या मराठमोळ्या बालिका.
Updated on

फ्रान्समधील पॅरिस या संपूर्ण जगाचं आकर्षण असलेल्या शहरात पंचवीस वर्षांपासून गणेशोत्सवात गणपतीची रथयात्रा निघते. यंदा मात्र कोविडपासून बचावासाठी खबरदारी म्हणून ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. ही माहिती तेथे वास्तव्याला असलेल्या डॉ. प्रियंका देवी - मारुलकर यांनी दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रियंकाताई म्हणाल्या, ‘‘पॅरिसमध्ये दक्षिण भारतीय धाटणीचं तीस वर्षं जुनं मंदिर आहे. ला शापेल या भागातील पंचमुखी गणेशाच्या या मंदिरापासून गणेश चतुर्थीला मोठी रथयात्रा निघते. मंदिराजवळील परिसरातून प्रदक्षिणा घालून तिचा समारोप होतो. यात भारतीयांबरोबरच तेथील इतर देशीय नागरिकही सहभागी होतात. भारतीय अनेक देवांची पूजा करतात हे या मंडळींना माहीत असलं तरी गजमुख असलेल्या या देवाशी त्यांचा परिचय उत्साहवर्धक कार्यक्रमांमुळे अधिक असतो.

महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवात या मंदिरात सगळे जमून पूजा, आरती केल्यानंतर प्रसाद घेऊन सगळेजण भारतीय रेस्टॉरंटमध्ये जाऊन सहभोजन करण्याची परंपरा रुजली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांची संख्या वाढत चालल्याने दोन वर्षांपासून एखाद्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडतो.’’ प्रियंकाताईंनी असंही सांगितलं की, आपल्या संस्कृतीशी असलेलं नातं टिकवत, त्याची ओळख आपल्या नव्या पिढीला आणि इतर देशांमधील मित्रांना करून देणं हा अशा तऱ्हेच्या आयोजनामागचा उद्देश आहे.

प्राणप्रतिष्ठा व विसर्जन केलं जात नाही, परंतु टाळाचा गजर करत गणपती स्तोत्र, आरती व श्‍लोक म्हटले जातात. कधी भारतातून आलेल्या कलावंतांचं सादरीकरण, तर कधी मंडळाच्या सदस्यांकडील छोट्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होतो. या सर्व कार्यक्रमांमध्ये फ्रेंच मंडळीही उत्साह व उत्सुकतेने सामील होतात. यंदा मात्र कोविडपासून बचावासाठी गर्दी टाळून साधेपणाने उत्सव साजरा केला जात आहे. येथे दीर्घकाळापासून राहणाऱ्यांची संख्या कमी असल्याने घरगुती गणेशोत्सवाऐवजी महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवात सर्वजण सहभागी होतात. आता संख्या हळूहळू वाढत चालली आहे. या सर्वांनी आपापल्या घरात थांबून उत्सव साजरा करण्यावर भर दिल्याचं चित्र सर्वत्र दिसतं आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com