esakal | पुणे - सोलापूर महामार्गावर कार अडवून केला हल्ला; धारधार शस्त्राने वार
sakal

बोलून बातमी शोधा

Gang attack on car at Pune Solapur highway

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (ता. 23) मध्यरात्री आकाश रावसाहेब फराटे हे आई अनिता यांच्यासह इनोव्हा गाडीतून (एमएच-14, एचपी-97) मधून पुणे - सोलापूर महामार्गावरून पिंपरी चिंचवड पुण्याकडे परत होते. रावणगाव हद्दीत अचानक मारूती कार (एमएच-48, एफ-2374) फराटे यांच्या इनोव्हा गाडीला आडवी लागून अचानक कारमधील चौघांनी आकाश रावसाहेब फराटे (रा. पिंपरी चिंचवड,पुणे) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये आकाश फराटे जखमी झाले. तर गाडीतील आकाशची आई व इतर महिलांना लाथाबुक्यांनी मारहाण केली​

पुणे - सोलापूर महामार्गावर कार अडवून केला हल्ला; धारधार शस्त्राने वार

sakal_logo
By
सावता नवले

कुरकुंभ : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रावणगाव (ता. दौंड) हद्दीत पुण्याकडे जाणाऱ्या इनोव्हा गाडीला मारूती कार आडवी लावून चार जणांनी धारधार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये एक जण जखमी झाला असून हल्लेखोरापैकी एकाला अटक करण्यात आली तर तीन जण पळून गेले. ही घटना रविवारी (ता. 23) मध्यरात्री घडली असून गुन्हा सोमवारी (ता. 24) दाखल करण्यात आला आहे.

'नासा'ला जमलं नाही ते 'आयुका'नं करून दाखवलं; अत्यंत दूरच्या दीर्घिकेचा घेतला शोध
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 23) मध्यरात्री आकाश रावसाहेब फराटे हे आई अनिता यांच्यासह इनोव्हा गाडीतून (एमएच-14, एचपी-97) मधून पुणे - सोलापूर महामार्गावरून पिंपरी चिंचवड पुण्याकडे परत होते. रावणगाव हद्दीत अचानक मारूती कार (एमएच-48, एफ-2374) फराटे यांच्या इनोव्हा गाडीला आडवी लागून अचानक कारमधील चौघांनी आकाश रावसाहेब फराटे (रा. पिंपरी चिंचवड,पुणे) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये आकाश फराटे जखमी झाले तर, गाडीतील आकाशची आई व इतर महिलांना लाथाबुक्यांनी मारहाण केली.

जखमी आकाश फराटे यांना उपचारासाठी भिगवण (ता. इंदापूर) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी मदतीस आलेल्या ग्रामस्थांनी चौघांपैकी एक हल्लेखोर अनिल शिवाजी बनसोडे (मूळ रा. अफजलपूर, जि. गुलबर्गा कर्नाटक) सध्या तो कांदिवली ईस्ट, दामुनगर शेवटचा बसटाॅप मुंबई येथे राहत आहे. याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तीन हल्लेखोर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी दौंड पोलिसांनी हल्लेखोर अनिल याच्यासह आणखी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तेजस मोहिते करीत आहेत.

Unlock 4.0 : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याला 'एवढ्याच' नागरिकांची पसंती; सर्व्हे काय सांगतो पाहा

पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनचालक, प्रवाशांवर हल्ले व लुटमार होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच मळद येथे एका वाहनचालकाचा खून झाल्याची घटना ताजी आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिस, टोल वसुली करणाऱ्या कंपनीने एकत्रित प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top