esakal | ‘बनेश्वर’लगत कचरा डेपो, सांडपाणी प्रकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

बनेश्वर

‘बनेश्वर’लगत कचरा डेपो, सांडपाणी प्रकल्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नसरापूर : ‘पीएमआरडीए’च्या विकास आराखड्यात नसरापूर येथील प्राचीन बनेश्वर शिवमंदिरापासून अवघ्या २०० मिटर अंतरावर कचरा डेपो व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. याला बनेश्वर देवस्थान ट्रस्टने जोरदार विरोध केला असून प्रकल्पाचे आरक्षण न हटविल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: दौंड : उप अधीक्षकांना बदलीची धमकी देणार्यास अटक

‘पीएमआरडीए’च्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत बनेश्वर देवस्थान ट्रस्टने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम दातार, सचिव अनिल गयावळ, सदस्य प्रकाश जंगम, हनुमंत कदम, आबासाहेब यादव, यशवंत कदम, कृष्णा फडतरे, रोहीदास कोंडे, आदी उपस्थित होते. या प्रश्नाबाबत खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे यांची भेट घेणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम दातार यांनी सांगितले.

हेही वाचा: लष्कराची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली; टपाल कर्मचाऱ्याला अटक

अनिल गयावळ म्हणाले, बनेश्वर मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर रचनाकारांनी मंदिरातील शिवलिंगाखालून तसेच मंदिर परिसरातील कुंड व मुख्य मंदिराला लागून असलेल्या दगडी पाटातून नैसर्गिकरित्या पाणी प्रवाहित केलेले आहे. हे या जागृत मंदिराचे वैशिष्ट आहे. मंदिराजवळूनच शिवगंगा नदी वाहते आहे. शेजारी मोठे वनउद्यान आहे, मात्र पुणे महानगर विकास आराखड्यात या मंदिर परिसराला लागून वरच्या बाजूस कचरा डेपो व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरणार असून तेथून मंदिर खालच्या बाजूस असल्याने तेथील दूषित पाणी मंदिरात येणार आहे.

हेही वाचा: आंबेगाव : 11 तोळ्याची चैन चोरून फरार आरोपीस अटक

रोहीदास कोंडे म्हणाले, परिसराचा कोणताही अभ्यास न करता हे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. बनेश्वर परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. येथील वनउद्यान, शिवगंगा नदी व त्यावरील धबधबा पाहण्यासाठी हजारो पर्यटक येतात. जर परिसराला लागूनच कचरा डेपो झाला तर पूर्ण परिसरात दुर्गंधी होणार आहे, तसेच संपूर्ण नदी प्रदूषित होणार आहे. नसरापूरसह अनेक गावच्या पाणी योजना या नदीवर आहेत, त्या देखिल बाधित होणार आहेत. त्यामुळे या प्रस्तावित प्रकल्पात बदल होणे गरजेचे आहे.

भाविक रस्त्यावर उतरणार

विश्वस्त प्रकाश जंगम म्हणाले, वस्तुस्थितीची पाहणी न करता मंदिराच्या वरच्या बाजूस नदीकिनारी हे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. याबाबत आम्ही योग्य ती हरकत दिली आहे, मात्र त्यावर योग्य निर्णय न झाल्यास भाविकांसह रस्त्यावर उतरावे लागेल.

loading image
go to top