Katraj News : बेजबाबदार नागरिकांमुळे कात्रज घाटात 'घाण'

दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या कात्रज घाटात काही बेजबाबदार नागरिकांमुळे घाण होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाकडून कात्रज घाटाची सातत्याने स्वच्छता करण्यात येते. नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून याठिकाणी एका कर्मचाऱ्याची नेमणूकही करण्यात आलेली आहे.
Katraj News
Katraj Newssakal

Katraj News : दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या कात्रज घाटात काही बेजबाबदार नागरिकांमुळे घाण होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाकडून कात्रज घाटाची सातत्याने स्वच्छता करण्यात येते. नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून याठिकाणी एका कर्मचाऱ्याची नेमणूकही करण्यात आलेली आहे. मात्र, घाटात अनेकवेळा वाहनाने कचरा, राडारोडा आणून टाकण्याचा प्रकार करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. असे प्रकार रात्री किंवा सकाळच्या वेळी लवकर करण्यात येतात.

पावसाळ्याच्या तोंडावर अशा कचरा टाकण्याने अधिक घाण होते. त्यामुळे कात्रज घाटातून बाहेर पडणाऱ्या पुणेकरांना त्रास सहन करावा लागतो. शहरालगतची हॉटेल, घरांमधील कचरा, बांधकामाचा राडारोडा आणि थर्माकॉलसारखा कचराही याठिकाणी टाकण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यानंतर हा कचरा महापालिकेला साफ करावा लागतो.

कात्रज घाट अशा बेजबाबदार नागरिकांमुळे घाण होत असून रात्रीच्यावेळी घाटात पोलिसांचीही गस्त असते. अशावेळी पोलिसांनीही याबाबतीत कचरा टाकणारे आढळून आल्यास थेट कारवाई करावी म्हणजे अशा बेजबाबदार नागरिकांना आळा बसेल, असे आवाहन क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

शिवकालीन कात्रज घाटाला ऐतिहासिक महत्व आहे. पर्यावरण व निसर्गसंपदा हे घाटाचे वैभव आहे. हा ठेवा जपण्याची जबाबदारी प्रशासनाची असून कठड्यावरून दरीत राडारोडा टाकण्याचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा लोकांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली तर अशा घटनांना आळा बसेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया

रस्त्याच्या कडेला राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असून याबाबत आम्ही क्षेत्रिय कार्यालय आणि पोलिस प्रशासन अशा दोन्ही खात्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. आम्हीही अनेकवेळा अशाप्रकारे राडारोडा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवून असतो, अशा बेजाबदार नागरिकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी ही आमची मागणी आहे.

- योगेश शेलार, स्थानिक नागिरक

कचरा टाकणाऱ्यांवर आपण सातत्याने कारवाई करत असतो. नुकताच कचरा टाकल्याप्रकरणी आपण पाच हजार रुपयांचा दंड आकारला आहे. सातत्याने दंडात्मक कारवाई केल्याने हे प्रमाण कमी झाले आहे. पंरतु, आणखी अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे घाटात कोणीही कचरा टाकू नये.

- प्रमोद ढसाळ, आरोग्य निरिक्षक, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय

Katraj News
Katraj Zoological Museum : कात्रज प्राणी संग्रहालयाची वर्षभरात सात कोटींची कमाई

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com