Gas Cylinder | गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ; वजनात घट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ; वजनात घट!
गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ; वजनात घट!

गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ; वजनात घट!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - दिवसेंदिवस वाढणारी महागाई, दिवसागणिक वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर त्यातच घरगुती सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच साधारणत: ३० दिवस जाणारा सिलिंडर आता २५ दिवस जात असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिक सिलिंडरच्या वजनाबाबत शंका उपस्थित करत आहेत.

घरगुती सिलिंडरचा भाव वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहेच पण केवळ किमतीचा भर्दंड सहन करण्याबरोबरच आता मिळणाऱ्या गॅसची चोरी होत असल्याचे चित्रही दिसून येत आहे. याबाबत वेळोवेळी संबंधित गॅस वितरकांना सांगूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे मंगला दिवटे या गृहिणीचे म्हणणे आहे. तर सिलिंडरची टाकी लिकेज असेल किंवा तुमचा गॅस सिलिंडरचा वापर वाढला असेल अशी मोघम उत्तरे दिली जातात.

महिन्याला ९२० रुपये सिलिंडरचा खर्च कसाबसा परवडतो पण आता त्यातही पाच दिवसांआधीच गॅस बदलावा लागत असल्याने आणखी तोटा होत असल्याचेही दिवटे यांनी व्यक्त केले. ही समस्या एकट्या दिवटे यांची नसून शहरातील विविध भागांमध्ये हा प्रश्न असल्याचे पाटील इस्टेट, मंगळवार पेठ, रामटेकडी आदी भागांतील नागरिकांनी व्यक्त केले. त्यामुळे याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील गृहिणींनी व्यक्त केले.

हेही वाचा: पुणे : पुनर्वसनाच्या कार्यवाहीमुळे शिवाजीनगरमधील वाहतुकीत बदल

ग्राहकांच्या मागण्या...

  • अनुदान सुरू करावे.

  • सिलिंडर वजन करून देण्याची सक्ती करावी.

  • गळतीची तपासणी करून वितरण करावे.

ग्राहकांच्या तक्रारी येतात, त्यानुसार निरसन केले जाते. डिलिव्हरी बॉयसोबत वजनकाटा असतो. त्याने सिलिंडरचे वजन करूनच वितरित अपेक्षित आहे.

- गॅस वितरक कंपनीचे अधिकारी

अनेक व्यक्तीच्या तक्रारी आहेत. चार महिन्यांत सिलिंडर २० दिवसांतच संपला. त्यानुसार तक्रार संबंधित गॅस वितरण कंपनीला केली आहे.

- विलास कांबळे, मंगळवार पेठ

सिलिंडर दोनदा पाच दिवस अधीच संपला. त्यामुळे सिलिंडरच्या वजनात घट होत असल्याची शंका आहे.

- मालन शेवंते, गृहिणी

loading image
go to top