
Marathi actress Gautami Patil meeting the family of the injured auto driver, expressing her support and concern after the tragic accident.
esakal
Gautami Patil Visits Family of Injured Auto Driver :काही दिवसांपूर्वी नृत्यागंणा गौतमी पाटीलच्या गाडी चालकाने पुण्यातील एका रिक्षाला धडक दिली होती. यामुळे घडलेल्या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले होते. तर गौतमी पाटीलचा कारचालक हा घटनास्थळावरून निघून गेला होता. तर गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हती. परंतु गाडीचालक तसाच निघून गेल्याने संतापलेल्या रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांनी गाडीची मालक म्हणून गौतमी पाटील विरोधातच तक्रार दाखल करत, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
शिवाय, यामध्ये नंतर पुण्यातील राजकीय नेते मंडळींनीही लक्ष घातले होते. तर पोलिसांनीही गौतमी पाटीलला चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यामुळे हे प्रकरण अधिकच गाजलं होतं. एवढंच नाहीतर गौतमी पाटीलवर विविध स्तरातून टीका देखील झाली.
खरंतर गाडीत उपस्थित नसतानाही गौतमी पाटीलला अनेक लोकांनी ट्रोल केलं. गौतमी पाटीलच्या नावावर असलेली गाडी तिचा चालक चालवत होता आणि पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात त्याने एका रिक्षाला धडक दिली होती.
मात्र गौतमी पाटीलवर आरोप होवू लागले आणि प्रकरण अधिकच चिघळू लागल्याने, अखेर गौतमी पाटील हिने स्वत: पत्रकारपरिषद घेत म्हटले होते की, ''माझी काहीही चूक नसताना मला गुन्हेगार ठरवलं जात आहे. माझा या घटनेची काहीही संबध नाही. मी पोलिसांनीही हे सांगितले आहे.’' तसेच, ''मी जर त्यावेळी तिथे असते तर नक्कीच मी हे वाढवू दिलं नसतं. आता जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल त्यानुसार बघू. जर हे लोक माझ्या नावाची बदनामी करत असतील तर मी त्यांना भेटायला का जाऊ? चालकाची चूक झाली हे मला मान्य आहे, त्याने त्यावेळी तिथे मदत करायला हवी होती.'' असंही गौतमी म्हणाली होती.
मात्र आता गौतमी पाटील हिने स्वत: अपघातामधील जखमी रिक्षाचालकाची व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत, विचारपूस केल्याचे समोर आले आहे. शिवाय, रिक्षाचालकाच्या मुलीनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे आता या अपघात प्रकरणावर एकप्रकारे पडदाच पडल्याचे स्पष्ट होते आहे.
‘१५ ऑक्टोबर रोजी जेव्हा माझ्या वडिलांना दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातून जेव्हा सूट्टी मिळाली. तेव्हा गौतमीताईंनी येऊन माझ्या वडिलांच्या तब्येतीचा आढावा घेतला आणि त्यांना आमची विचारपूस केली. आम्ही जो काही संपर्क साधला, त्यासाठी त्या आल्या त्याबद्दल त्यांचे खरच धन्यवाद. ’’ असं अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाच्या मुलीने सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.