
Chandrakant Patil Intervenes in Gautami Patil Accident Case Calls Police Directly
Esakal
गौतमी पाटीलच्या गाडीने एका रिक्षाला धडक दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तिला नोटीस बजावली आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात मंगळवारी पहाटे हा अपघात झाला होता. गाडीने रिक्षाला धडक दिल्यानं रिक्षा चालक जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी कारवाईची मागणी होत असून राजकीय पक्षांकडूनही हा मुद्दा उचलून धरण्यात आलाय. शिवसेना ठाकरे गटाकडून गौतमी पाटीलवर कारवाई करावी आणि पोलिसांकडून योग्य तपास केला जात नसल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना कॉल करून गौतमीवर कारवाई करायचीय की नाही असा प्रश्न केला. चंद्रकांत पाटील यांचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.