भूगोल सहजतेने शिकण्यासाठी भूme प्रयोगशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhume
भूगोल सहजतेने शिकण्यासाठी भूme प्रयोगशाळा

भूगोल सहजतेने शिकण्यासाठी भूme प्रयोगशाळा

खडकवासला - इतिहास, (History) भूगोल (Geography) हे विषय शिकताना (Learn) मुलांना (Children) कंटाळा येतो. दोन्ही विषयाचे पाठांतर न करता. समजून घेऊन गुण मिळवावे. म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या नऱ्हे येथील व्हिजन इंग्लिश मिडीयम शाळेत 'भूme' (Bhume) ही भूगोल विषयाशी निगडीत प्रयोगशाळा (Laboratory) तयार केली आहे. चला आजच्या भूगोल दिनाच्या निमित्ताने या प्रयोग शाळेची माहिती घेऊ या…

इतिहास- नागरीक शास्त्रातून आपल्याला रोजच्या जीवनात संस्कृतीचा इतिहास, खाद्य संस्कृती, नद्या, निसर्गाला देवता समान मानणे, उत्तम नागरिक कसा असावा याचे शिक्षण मिळते. इतिहास विषय शिकताना त्याची पाळेमुळे भूगोलातच सापडतात.

अशी आहे भूme प्रयोगशाळा

-भूगोलातील विविध संज्ञा स्पष्ट करणारे ४२ तक्ते विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत. आकृत्या, भौगोलिक घटकांच्या चित्रांचा यात समावेश आहे.

-ग्रहण, ऋतू, भूरुपे, त्यांची कार्ये, इत्यादी अशा विविध संज्ञा स्पष्ट करणाऱ्या ४९ प्रतिकृती तयार केल्या आहेत.

-झोपडी, कौलारु, कमी उंचीची, जास्त उंचीची, प्राचीन, आधुनिक घरे असे घरांचे २६ प्रकार आहेत. यातील काही घरे मुलांनी खूप कुशलतेने बनवली आहेत.

-जगभरात दगडाचे किती प्रकार असतील, तुम्ही मोजायला लागला ना, या प्रयोगशाळेत ४० प्रकारचे दगड आहेत. शहरातील एका व्यक्तीकडून घेऊन येथे ठेवले आहेत. देशी- परदेशातील विविध आकारातील दगड आहेत.

-जग, खंड, देश, त्यांच्या राजधान्या, त्यांचे राष्ट्रीय प्राणी, पक्षी, फूल, फळ, झाड, चलन, पोषाख, सण, उत्सव, राष्ट्र आणि शहर यांची माहिती देणारे असे ८३ प्रकल्प येथे आहेत. भौगोलिक कोडी, मासिके, पुस्तके, नकाशे, भित्तीपत्रके, खेळ, नाणी, तिकिटांचा संग्रह, मातीचे वेगवेगळे प्रकार, विशिष्ट प्रदेशातील प्राणी व वनस्पती यांचे प्रकार अशा विविध प्रतिकृती आणि अनेक शैक्षणिक साधने शिक्षक, विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत. असा भौगोलिक खजिना भूगोल प्रयोगशाळेत आहे.

प्रयोगशाळा उभारण्यासाठीची निरीक्षण आणि नोंदी -

- इतिहास, भूगोलातील अमूर्त संकल्पना न समजल्यामुळे विषय कंटाळवाणे होतो. अमूर्त संकल्पनांना मूर्त स्वरूप कसे द्यावे. याविचार मंथनातून काही गोष्टी पुढे आल्या.

- जुन्या काळातील अनुभव आणि आधुनिक काळातील अभ्यासक्रमाच्या अपेक्षा यांची सांगड घालणे.

- काही संकल्पनांचा अर्थ नव्याने समजून देणे. ‘सहल' संकल्पना आता बदलली आहे. पूर्वी सहल म्हणजे निसर्गाचा आस्वाद घेणे, निसर्गाच्या कुशीत रमणे. परंतु, आता मॉल, सिनेमागृहे ही सहलीची ठिकाणे झाली आहेत.

- भौगोलिक साधनसाधन संपत्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले पाहिजे. शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरणाच्या माध्यमांसह समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांचे एकत्रीकरण घडविले पाहिजे.

हेही वाचा: मोबाईल गेम खेळणाऱ्यांच्या संख्येत पुणे देशात तिसऱ्या क्रमांकाचे शहर

प्रयोगशाळेचा विद्यार्थ्यांना काय फायदा

- विद्यार्थ्यामध्ये मूल्याधारित आणि सृजनशील विचार करण्याची प्रवृत्ती विकसित होईल.

- निसर्गातील विविध घटक, भौगोलिक विविधता यांचा परिचय होईल.

- प्रत्यक्ष सहभागामुळे अमूर्त संकल्पना मूर्त होतील.

- मुलांना शिकविण्याची प्रक्रिया प्रभावी होईल.

- विद्यार्थी आणि भूमाता याची नाळ जोडली जाऊन विषयाशी एकरूप होतील.

शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांना सृजनशील, आकलनक्षम, प्रेरणादायी पद्धतीने शिकवतात. विषयात गोडी निर्माण व्हावी, विषय समजावा, अधिक सोपा व्हावा, विषयाचे उत्तम अध्ययन व्हावे. यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थी भूगोलाचे सहज- सोप्या पद्धतीने, प्रत्यक्ष अनुभूतीतून शिक्षण घेतील. ही प्रक्रिया अधिक प्रभावी ठरेल. अशी खात्री वाटते. विद्यार्थी आणि प्रयोगशाळेचे नाते जुळले की, विद्यार्थी भूगोल विषयाचा अभ्यास आनंदाने करतील.

- डॉ. पी.व्ही.शास्त्री, सचिव, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था

हेही वाचा: पुणे महापालिका हद्दीतील बांधकामे सरसकट नियमित नाहीत

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा वारसा, शाळेच्या ब्रीद वाक्यानुसार विद्यार्थ्यांचा निरागसपणा जपत त्यांना उत्कृष्टतेकडे नेण्याकरता आम्ही उपक्रम राबवितो. प्रत्येकातील me हा भूमीशी जोडल्याने प्रयोगशाळेचे नामकरण भूme असे केले आहे. भूगोल विषय अतिशय रंजक आहे. विविधतेने नटलेल्या सृष्टीचा अभ्यास यात आहे. उत्तुंग पर्वतरांगा, नयनरम्य निसर्ग, खडकांचे विविध अविष्कार, विविध रंगछटा असलेली जमीन, नटलेली वसुंधरा, खळाळून वाहणाऱ्या नद्या, धबधबे, जंगलाचे विविध प्रकार या नैसर्गिक घटकांनी नटलेला भूगोल विषय आहे. या घटकांची आकर्षक चित्रे शाळेच्या भिंतीवर रेखाटली जात आहेत. तसेच, मानवी घटकाचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. घर, विविध पोशाख, अन्न, वस्त्र, व्यवसायाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण व्हावे, विषयाची आवड निर्माण होण्यासाठी 'भूme' ही प्रयोगशाळा साकारली. संस्थेच्या अध्यक्षा आणि सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात आला.

- कांचन सातपुते, प्राचार्या, व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल

थोडक्यात भूme प्रयोगशाळा

४२- प्रकारचे तक्ते

४९- प्रकारच्या प्रतिकृती

२६- घरांचे प्रकार

४०- प्रकारचे दगड

८३- प्रकल्प आणि बरेच काही

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationNigdi
loading image
go to top