
नव्या युगाचा नवीनतम आणि अमर्याद ऊर्जास्रोत म्हणून ‘न्यूट्रीनो एनर्जी’कडे पाहिले जाते. पर्यावरणपूरक असलेल्या या ऊर्जास्त्रोतामध्ये पुढच्या पिढीची ऊर्जेची सर्व गरज भागविण्याची क्षमता आहे. या भविष्यकालीन तंत्रज्ञानासाठी भारत आत्ताच सज्ज होत असून, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या पुढाकारातून जर्मनीतील ‘न्यूट्रीनो एनर्जी ग्रुप’ पुण्यातील ‘सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी’ला (सी-मेट) सहयोग करणार असून, यासंबंधीची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे.
पुणे - नव्या युगाचा नवीनतम आणि अमर्याद ऊर्जास्रोत म्हणून ‘न्यूट्रीनो एनर्जी’कडे पाहिले जाते. पर्यावरणपूरक असलेल्या या ऊर्जास्त्रोतामध्ये पुढच्या पिढीची ऊर्जेची सर्व गरज भागविण्याची क्षमता आहे. या भविष्यकालीन तंत्रज्ञानासाठी भारत आत्ताच सज्ज होत असून, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या पुढाकारातून जर्मनीतील ‘न्यूट्रीनो एनर्जी ग्रुप’ पुण्यातील ‘सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी’ला (सी-मेट) सहयोग करणार असून, यासंबंधीची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे.
जर्मनीच्या न्यूट्रीनो एनर्जी ग्रुपचे सदस्य असलेले डॉ. भटकर आणि सी-मेटचे महासंचालक डॉ. भारत काळे यांनी ‘सकाळ’ला याबाबतची माहिती दिली. जर्मनीच्या ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. होल्गर थॉस्टर्न सुबार्ट याच्या नेतृत्वात भारतातील सी-मेट सोबत सहयोग (कोलॅबरेशन) करणार आहे. यामुळे ‘न्यूट्रीनो एनर्जी’च्या प्रत्यक्ष वापरासाठी भारतात तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
काय आहे न्यूट्रीनो एनर्जी ?
न्यूट्रीनो हा अणूमधील एक मूलभूत कण आहे. विश्वात सर्वत्र म्हणजेच वैश्विक किरणांमध्ये (कॉस्मिक रेडिएशन) न्यूट्रीनो आढळतात, एवढंच काय तर ते पृथ्वीच्या आरपारही जातात. २०१५ मध्ये जपानचे शास्त्रज्ञ डॉ. टाकाकी काजिता आणि कॅनडियन शास्त्रज्ञ डॉ. मॅकडॉनल्ड यांनी या न्यूट्रीनोंना वस्तुमान असल्याचे सिद्ध केले. एखाद्या गोष्टीला वस्तुमान असले तर आइन्स्टाईनच्या ‘ऊर्जा = वस्तुमान गुणिले प्रकाशाच्या वेगाचा वर्ग’ या प्रसिद्ध सिद्धांतानुसार आपल्याला ऊर्जा मिळविता येते.
मुक्त विद्यालयातून अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, नावनोंदणीसाठी मुदत वाढवली
मर्यादा -
- प्रायोगिक तत्त्वावरील हे संशोधन अजून प्रत्यक्ष वापरात नाही.
- आर्थिकदृष्ट्या हे तंत्रज्ञान सामान्यांना परवडेल का? याबद्दल पुरेशी माहिती नाही.
न्यूट्रीनो एनर्जीची तुलना तुम्ही ‘सोलर सेल’शी करू शकता. एकदा की सूर्यप्रकाश संपला तर सोलर सेल काही कामाचा राहत नाही. याउलट, न्यट्रीनो सेल दिवसरात्र तुम्हाला ऊर्जा मिळवून देईल.
- प्रा. होल्गर थॉस्टर्न सुबार्ट, सीईओ, न्यूट्रीनो एनर्जी ग्रुप, जर्मनी.
नववर्ष बारामतीकरांसाठी ठरणार महत्वाचे...महत्वाकांक्षी प्रकल्प लागणार मार्गी
शास्त्रज्ञ नक्की काय करणार ?
‘न्यूट्रीनो सेल’चे फायदे
हा विषय नवा असून, सी-मेटने यातील संशोधनासाठी पुढाकार घेतला आहे. प्रा. होल्गर यांच्या नेतृत्वात न्यूट्रीनो एनर्जी ग्रुपने भारताच्या सहभागासाठी रस दाखवला असून, यातून इलेक्ट्रीक वाहने आणि उपकरणांसंबंधी हे संशोधन होणार आहे.
- डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ
Edited By - Prashant Patil