

Female Leopard Found Dead After Falling Into Farm Well in Babhulwadi
Sakal
घोडेगाव : (ता. आंबेगाव) जवळील बाभूळवाडी येथील समीर गव्हाणे यांच्या शेतातील विहीरीत पडून बिबट मादीचा मृत्यु झाला असल्याचे घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी सांगितले. घोडेगाव वनविभागात 100 हून अधिक बिबट्या असल्याचा अंदाज नागरिक व्यक्त करीत आहे. ऊस तोडणी सुरू असल्याने बिबट्या आता सैरभैर झाला आहे. भक्ष्याच्या शोधात अशा घटना होत आहेत. मृत बिबट मादी अंदाजे दीड वर्षाची असून त्वचा व नखे सहीत सर्व अवयव शाबूत होते.