'अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार'

girish bapat will follow up for Bharat Ratna to Annabhau Sathe
girish bapat will follow up for Bharat Ratna to Annabhau Sathe

पुणे : आपल्या अलौकिक प्रतिभेतून कला आणि साहित्य विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले सगळे आयुष्य कामगार आणि कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी वेचले. त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कराने सन्मानित केले पाहिजे. यासाठी मी स्वतः गृहामंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहे, अशी माहिती संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कॅटॅलिस्ट फाउंडेशनने साकारलेल्या अण्णाभाऊंवरील पहिल्या वहिल्या www.annabhausathe.com या वेबसाईटचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. लोकप्रिय गायक नंदेश उमप, प्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक डॉ. अंबरीश दरक, राघवेंद्र मानकर, कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने आदींच्या उपस्थितीत फेसबुक लाईव्ह द्वारे हा कार्यक्रम झाला. रौनित वाघ, पुष्कर गायकवाड यांनी या वेबसाईटची निर्मिती केली आहे.

कोरोनाची साथ असताना, दुसरीकडे एक लाखाहून अधिक ज्येष्ठांना अन्य आजार

यावेळी  बापट म्हणाले, अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरी पोवाड्याच्या मध्यातून चुकीच्या गोष्टींवर प्रहार केला. परिस्थितीमुळे सांगली जिल्ह्यातून मुंबईला आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्यांनी पडेल ते काम केले. मात्र अशा परिस्थितीत ही कामगारांना भांडवलदारी व्यवस्थेतून वाचवण्यासाठी, अन्याय झालेल्या माणसाला पुन्हा सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. अण्णाभाऊंची साहित्य संपदा विपुल आहे. आजच्या धावत्या युगात त्यांच्या साहित्याचा आस्वाद घ्यायचा झाल्यास ही वेबसाईट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कॅटलिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून या पुढेही अण्णांचे विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत.

अण्णाभाऊंचे कार्य डिजिटल स्वरुपात जनतेसमोर आणण्याच्या निश्चयाने या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. अण्णाभाऊंचे अलौकिक व्यक्तिमत्व, त्यांची व्यापक साहित्य संपदा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील त्यांचे योगदान, लोकशाहीर म्हणून त्यांनी केलेले समाजप्रबोधन या विषयीची एकत्रित माहिती या वेबासाईटच्या माध्यमातून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे, असे संस्थेचे अध्यक्ष सुनील माने यांनी सांगितले. या वेबसाईटसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष  डॉ. सदानंद मोरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक  डॉ. संजय संभळकर यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले असल्याचे ही त्यांनी सांगितले.

सायकल, कार नव्हे तर, आता जनावरांची खरेदी-विक्रीही ऑनलाईन

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदेश उमप यांनी अण्णांच्या साहित्याचा, शाहिरीचा तसेच त्यांच्या चळवळीचा वारसा अत्यंत विश्वासाने पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com