आईचा अंत्यविधी उरकून दिला दहावीचा पेपर..मार्क पाहून कराल कौतुक

सुदाम बिडकर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील ज्ञानेश्वरी दादाभाऊ गवंडी या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर आईचा अंत्यविधी उरकून दिला होता. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही तिने दाखविलेल्या या धैर्याचे सर्वांनी कौतुक केले होते.

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील ज्ञानेश्वरी दादाभाऊ गवंडी या विद्यार्थिनीने इयत्ता दहावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर आईचा अंत्यविधी उरकून दिला होता. दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही तिने दाखविलेल्या या धैर्याचे सर्वांनी कौतुक केले होते. नुकत्याच लागलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात तीला 69.60 टक्के गुण मिळाले. त्यामुळे पुन्हा ती सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे.

निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे आधरवड बनले सातकर गुरुजी

आईचा अंत्यविधी उरकून धामणी (ता. आंबेगाव) येथील ज्ञानेश्वरी दादाभाऊ गवंडी या विद्यार्थीनीने मराठी विषयाचा पेपर दिला होता तीने दाखवलेल्या ध्येर्याचे सर्वांनी कौतुक केले होते नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात तीला 69.60 टक्के गुण मिळाल्याने पुन्हा ती सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. 

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

दहावीच्या परीक्षेचा तीन मार्च रोजी पहिला पेपर होता. दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थांच्या शैक्षणिक जीवनाचा पाया असतो. या परिक्षेची विद्यार्थी वर्षभर तयार करत असतात. अशाच प्रकारे धामणी येथील श्री शिवाजी विद्यालयात दहावीत शिकत असलेल्या ज्ञानेश्वरी गंवडी या विद्यार्थिनीने वर्षभर अभ्यास केला. पहिला पेपर म्हणून सकाळी लवकर परीक्षा केंद्रावर पोचायचे, यासाठी अगोदरच्या दिवशी रात्री अभ्यास करून ती झोपण्याच्या तयारीत होती. मात्र, त्याचवेळी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तिची आई सविता (वय 37) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

गवंडी कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. तरीही परीक्षेच्या पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरी हिने मोठ्या धैर्याने आईचा अत्यंसंस्कार उरकला. त्यानंतर नातेवाईक, भाऊ व वडील यांनी तीला आधार दिला. तसेच, परीक्षेला नाही गेले तर वर्ष वाया जाणार, असे सांगितले. त्यामुमुळे ज्ञानेश्वरी हिने मनाची तयारी करून धीर दाखवत वेळेवर सकाळी 10.30 वाजता पहिल्या पेपरला गेली. मराठी विषयाचा पेपर होता. तीने मोठ्या हिमतीने पेपर दिला. तीच्या या धैर्याचे त्यावेळी कौतुक झाले. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात ती 69.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. याबद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A girl from Ambegaon taluka succeeds in class X examination