धक्कादायक! राहत्या घरात आढळला मुलीचा मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

दोन दिवसांपासून तिचे पालक तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर सोमवारी तेजशाची आई पुण्यात आली होती. दरम्यान, तेजशा घरामध्ये मृतावस्थेत आढळली.

पुणे : सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत माधवबागेत उच्चशिक्षीत मुलीचा राहात्या घरात मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार काल(सोमवारी) उघडकीस आला. मुलीच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा असून घरात तीन ते चार दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

#Worldhandicappedday जगण्याच्या आभाळात ऊर्मीचं चांदणं! (व्हिडिओ) 

माणिकबाग येथील ब्रह्मा हॉटेलसमोरील राधाकृष्ण अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर ही तरुणी राहत होती. तेजशा श्‍यामराव पायाळ (वय 26) असे तिचे नाव आहे. ती मूळची बीडची होती. पुण्यात भागीदारीत व्यवसाय करीत होती.

#PmcIssue ताडपत्रीखाली काय लपविले आहे सुतार दवाखान्यात

दोन दिवसांपासून तिचे पालक तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर सोमवारी तेजशाची आई पुण्यात आली होती. दरम्यान, तेजशा घरामध्ये मृतावस्थेत आढळली. त्यावेळी घरात मद्याच्या बाटल्या, अर्धवट खाल्लेले अन्न; तसेच इतर वस्तू होत्या. तसेच तिचा मृत्यू आहे की, आत्महत्या, याबाबत माहिती समजली नाही. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून तपास सुरू होता. 

कोंडाणा उंदीर आता चार किल्ल्यांवर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The girl dead body was found in the living room at Manik Baug In Pune