तिने दगड गिळला अन्....

मिलिंद संगई
Sunday, 9 February 2020

काही मिनिटांचा उशीर हा भाग्यश्रीच्या जिवावर बेतला असता, मात्र डॉ. राजेंद्र व डॉ. सौरभ मुथा तसेच डॉ. अमर पवार या त्रिकुटाने वेगवान हालचाली करुन दगड बाहेर काढत या चिमुकलीला मरणाच्या दाढेतून बाहेर खेचून आणले.

बारामती : ज्याच्या नशीबाची दोरी घट्ट असेल त्याला कितीही संकटे आली तरी काही होत नाही, याचा प्रत्यय आज बारामतीत आला. पाच महिन्यांच्या एका चिमुकलीने खेळताना दगड गिळला आणि तिचा श्वासोच्छवास मंद होऊ लागला. उसतोड कामगारांची ही चिमुरडी...पहिल्यांदा त्यांना नेमकं काय करावं सुचेना...बारामतीपासून काही कि.मी. अंतरावर उसतोडीच काम सुरु असताना हा प्रकार घडला.

हे पण वाचा - का होते मुलींची छेडछाड : वाचा सकाळचा स्पेशल रिपोर्ट ताज

एकतर मराठी भाषा व्यवस्थित बोलता येत नाही, चिमुकलीला कुठं आणि कसं घेऊन जाव हे त्यांना सुचत नव्हत, खिशात पैसे नाहीत, काय करायच हे कळत नव्हत.....मात्र कोणीतरी बारामतीत या चिमुकलीला घेऊन जा असा सल्ला दिला आणि पालकांनी धाव घेतली ती बारामतीचे बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा यांच्याकडे. 

सुदैवाने डॉ. राजेंद्र व डॉ. सौरभ मुथा दवाखान्यातच होते. पाच महिन्यांच्या भाग्यश्री पिंपळे हिने दगड गिळल्याचे सांगितल्यानंतर मुथा पितापुत्रांच्या घटनेचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये या बाळाला घेतले. डॉ. अमर पवार यांना तातडीने पाचारण केले गेले, काही मिनिटातच पवार हेही तेथे पोहोचले आणि भूल देत मुथा डॉक्टरांनी हा पाच महिन्यांच्या चिमुकलीच्या पोटातून दगड व त्याचा चुरा लीलया बाहेर काढला. 

हे पण वाचा - आता कोरोना व्हायरसला घाबरायची गरज नाही; हे वाचा! 

काही मिनिटांचा उशीर हा भाग्यश्रीच्या जिवावर बेतला असता, मात्र डॉ. राजेंद्र व डॉ. सौरभ मुथा तसेच डॉ. अमर पवार या त्रिकुटाने वेगवान हालचाली करुन दगड बाहेर काढत या चिमुकलीला मरणाच्या दाढेतून बाहेर खेचून आणले. बोलता येत नाही काही सांगता येत नाही अशा स्थितीत गंभीर झालेल्या भाग्यश्रीला मुथा पितापुत्र देवदूताच्या रुपाने भेटले आणि तिची जीवनाची दोरी अधिक बळकट झाली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Girl life saved by doctors

Tags
टॉपिकस
Topic Tags: