दापोडीत रोडरोमिओंमुळे विद्यार्थिनी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

तक्रारपेट्या गायब
पूर्वी शाळांमधून यासाठी पोलिस ठाण्यांकडून तक्रारपेट्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सद्यःस्थितीत अनेक शाळांसमोर तक्रारपेट्याच नसल्याचे चित्र आहे. या तक्रारपेट्या पुन्हा केव्हा ठेवणार, अशी विचारणा विद्यार्थिनी करीत आहेत.

जुनी सांगवी - दापोडी शाळा परिसरात रोडरोमिओंचा त्रास वाढला असून, शाळकरी, महाविद्यालयीन मुलींच्या छेडछाड प्रकरणांमुळे पालक व मुलींच्या तक्रारी येत आहेत. शाळेबाहेर थांबण्यास प्रतिबंध केल्यास शिक्षकांनाही दमबाजी केली जाते. हे प्रकार सर्रास घडत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला दुचाकीवर ट्रिपलसिट येऊन अल्पवयीन मुले छेड काढतात. अश्‍लील शेरेबाजी करणे, कर्कश हॉर्न वाजवत धुमाकूळ घालतात. भीतीपोटी मुली तक्रार द्यायला धजावत नसल्याने त्यांचे फावते. ‘पोलिस काका’ पथक काही काळासाठी सुरू होते. मात्र मध्यंतरी ही यंत्रणा मोडकळीस निघाली. या पथकाची पुन्हा शाळा परिसरात नेमणूक करावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक, शाळांकडून होत आहे.

आजपासून तुझी उलटी गिनती सुरू कर, तुला अन् तुझ्या मुलाला मारुन टाकीन

रोजच्या कटकटी नको म्हणून शिक्षकही या रोडरोमिओंच्या दहशतीखाली असल्याचे 
एका शिक्षकाने ‘सकाळ’ला सांगितले. छेडछाडप्रकरणी प्रतिबंध व विचारणा केल्यास शिक्षकांनाही ही मुले न जुमानता दमबाजी करत असल्याचे एका शिक्षकाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.

पुण्यात वृद्ध महिलेच्या अंगावरुन रिक्षा घालत रिक्षाचालकाने लुटले 25 हजार रुपये

धडक कारवाईची गरज
बारावी, दहावीच्या परीक्षाकाळात असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याने आत्तापासूनच अशा प्रकारांना पोलिसांकडून जरब बसावी, अशी मागणी होत आहे. अशा प्रकारांबाबत मदतीसाठी पोलिसांत संपर्क केल्यास फोन लागत नसल्याच्या तक्रारी येत आहेत; तर अनेकदा ‘करू-बघू’ अशा प्रकारची उत्तरे मिळाल्याचे नागरिकांनी सांगितले. यासंदर्भात भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सांगितले की, कोटऱ्या परिसरात नियमित गस्त सुरू असून, शाळा परिसरात गस्त वाढविण्यात येईल. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस धडक कारवाई करत आहेत. विद्यार्थी, पालक, शाळा प्रशासनानेही याकामी पोलिसांना सहकार्य करावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Students Distressed from Dapodi road romeo