धक्कादायक! तरुणीच्या घरासमोरील वाहनांची तोडफोड करून ऍसिड हल्ल्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

मंगळवारी (ता. 4) आरोपी सागर हा पिडित तरूणीच्या घराजवळ गेला. तरूणीच्या घराबाहेरील वाहनांची त्याने तोडफोड केली. तरूणीच्या आई-वडीलांना शिवीगाळ केली. "तुला मारीन, तुमचे हॉटेल बंद करीन' अशी धमकी देत तरूणीच्या अंगावर ऍसिड टाकण्याचीही धमकी दिली. 

पिंपरी : तरूणीचा पाठलाग करीत तिच्या घरासमोरील वाहनांची तोडफोड केली. यासह तरूणीच्या अंगावर ऍसिड टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली. 

तुझे लग्न झालेले आहे, तरीही आपण...

याप्रकरणी 24 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर सतिश दिक्षित (वय 28, रा. पिंपळे गुरव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी तरूणीचा वारंवार पाठलाग करीत शिवीगाळ करून मारहाण केली. यासह तरुणीशी अश्‍लील वर्तन केले.

चक्क झेडपी शाळेसाठी विद्यार्थ्यांचे वेटिंग, कुठे आहे ही शाळा?

मंगळवारी (ता. 4) आरोपी सागर हा पिडित तरूणीच्या घराजवळ गेला. तरूणीच्या घराबाहेरील वाहनांची त्याने तोडफोड केली. तरूणीच्या आई-वडीलांना शिवीगाळ केली. "तुला मारीन, तुमचे हॉटेल बंद करीन' अशी धमकी देत तरूणीच्या अंगावर ऍसिड टाकण्याचीही धमकी दिली. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पुणे- दौंड लोहमार्गाचे चौपदरीकरण होणार कधी?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Girl Threatened to acid attack In Pimpri