लॉकडाऊन इफेक्ट! पुण्याच्या पोरींनी वाढवलं घरच्यांच टेन्शन; पैंजण विकून 'मुंबई'ची भटकंती

minor girls from Pune travel to mumbai by selling
minor girls from Pune travel to mumbai by selling

पुणे : ''मुंबईला मायनगरी असं म्हणतात. या मायानगरीच्या ग्लॅमरला अनेक जण भूलतात आणि मूंबईमध्ये येत असतात. अशा मुंबईमध्ये जाण्याचा मोह पुण्यातील अवघ्या 12 ते 16 वर्षाच्या 4 मुलींनाही झाला. मुंबईत जाऊन बीच पाहण्यासाठी त्यांनी पैंजण विकून 5 हजार रुपये जमवले आणि चौघी बॅगा घेऊन घराबाहेर पडल्या. इकडे घाबरलेल्या पालकांनी मुलींची शोध- शोध करत अखेर वारजे माळवाडी पोलिस स्थानकात अपहरणाची तक्रारही दाखल केली आहे. पोलिसांनीही ताताडीने सुत्रे हलविली आणि मुलींचा शोध घेतला. मुलींना पालकांच्या हवाली करुनच निश्वास सोडला.''

मराठ्यांच्या ध्येयाचा पानिपतमध्ये विजय 

वारजे माळवाडी येथील एका वसाहतीत राहणाऱ्या 12 वर्षाची एक, तेरा वर्षाच्या दोन आणि 16 वर्षाची एक अशा चौघींजणींनी  लॉकडाऊनमध्ये घरात बसून कंटाळल्यामुळे मुंबईला जाण्याचा बेत आखला. त्यासाठी मुंबईला कसे जायचे याची माहिती मागील एक महिन्यात त्यांना घरच्यांकडून मिळविली होती.  मुंबईला जायचे म्हणजे प्रवासाचा खर्च आलाच? मग काय पोरींनी सोन्या मारुती चौकात पैंजण विकले आणि 5 हजार रुपये जमवले. त्यांच्याकडे चार ते पाच हजार रुपये जमा झाले. रविवारी (ता.10) दुपारी अखेर चौघीं मुंबई गाठण्यासाठी बॅगा घेऊन घराबाहेर पडल्या. बराच वेळ मुली घरी न आल्यांने पालकांनी शोधाशोध सुरु केली. रात्री 8  वाजले तरी मुली घरी आल्या नाही. अखेर पालकांनी वारजे पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यांना घडला प्रकार सांगत अपहरणाची तक्रार दाखल केला. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीन सुत्रे हलविली आणि मुलींचे लोकेशन ट्रक केले. वडगाव मावळ परिसरात परिसरात लोकेशन मिळाले. मुली मुंबईकडे जात असल्याची शंका आल्याने मुंबई एसची पोलिस ठाणे, मुंबई कंट्रोल रुम यांना मुलीबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलींचे फोटो आणि वर्णण व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. त्यानुसार पोलिसांशी संपर्क साधून तेथील पोलिसांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. 

आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही 

दरम्यान, मराठे यांनी दिलेल्या वर्णनानुसार चार मुली पहाटे साडेतीनच्या सुमारास सीएसटी स्थानकात उतरल्या असता, त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर पुणे पोलिसांना याबाबत कळवले. पुणे पोलिस मुलींना आणण्यासाठी मुंबईला रवाना झाले. मुलींना सुखरूप पोलिस ठाण्यात आणले आणि पालकांच्या हवाली केले. मुलींच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले. वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे गुन्हे निरिक्षक अमृत मराठे यांच्या पथकाने चार तासांच्या आत मुलींचा शोध घेतली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com