Junnar News : गडाचीवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी

भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने सतीश कोकरे यांच्या डोक्याजवळ झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला
goat keeper injured in leopard attack  junnar forest department animal
goat keeper injured in leopard attack junnar forest department animal Sakal

- अशोक खरात

खोडद : मेंढ्यांच्या वाड्यावर झोपलेल्या मेंढपाळ व्यावसायिकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी दि.१७ रोजी खोडद गडाचीवाडी (ता.जुन्नर) येथे घडली.सतीश दैनु कोकरे (वय - २०) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, खोडद येथील गडाचीवाडी या परिसरात सतीश कोकरे या मेंढपाळ व्यवसायीकाने मेंढ्यांचा वाडा लावलेला आहे.बुधवारी रात्री सतीश कोकरे हे या वाड्यावर झोपले होते. त्यांच्या डोक्याजवळ त्यांचे पाळीव कुत्रे झोपले होते.

भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने सतीश कोकरे यांच्या डोक्याजवळ झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.या हल्ल्यात कोकरे यांच्या डोक्याला जखम झाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच ओतूर परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी.एस.शिंदे ,

वनरक्षक विशाल गुंड , वनसेवक बाळू वामन यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सतीश कोकरे यांना नारायणगाव येथे घेऊन गेले व त्यांच्यावर प्रथमोपचार केले. "ज्या ठिकाणी मेंढपाळ व्यावसायिकांचे वाडे आहेत, त्या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याची दाट शक्यता असते.

त्या परिसरात बिबट्याचा भक्ष्यासाठी वावर वाढतो.वाड्यावर असताना मेंढपाळ बांधवांनी आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.

वाड्यावर मुक्कामी असताना. मेंढपाळ बांधवांनी उघड्यावर आणि जमिनीवर झोपू नये. झोपण्यासाठी बाजेचा वापर करावा. यासाठी मेंढपाळ बांधवांना वारंवार सूचना केल्या जात आहेत." असे ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com