जे. के. देवांनी आणला सोनखरेदीचा ''सुवर्णकाळ''

जे. के. देवांनी आणला सोनखरेदीचा ''सुवर्णकाळ''
Published on

जे. के. देवींनी आणला
सोने खरेदीचा ‘सुवर्णकाळ’

सातारा, ता. २२ ः सोन्याचा बाजारभाव अस्थिर असल्याने सोने खरेदीचा मुहूर्त गाठणे अवघड वाटत आहे. पारंपरिक सणांची परंपरा असलेल्या जे. के. देवी ॲण्ड सन्स ज्वेलर्सने साताऱ्यासाठी ‘सुवर्णकाळ’ ही ग्राहकाभिमुख योजना सुरू केली आहे. ही योजना १८ सप्टेंबरपासून १८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
यामध्ये ग्राहकांना कमी दरात दागिने मिळणार आहेत. दसरा दिवाळीला सोने खरेदीचा विचार केला जातो. सद्यःस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव कधी उसळी घेतो, तर कधी कमी होईल याचा अंदाज लावणे अवघड झाले आहे.
याचा विचार करून जे. के. देवी ॲण्ड सन्स ज्वेलर्स यांनी ‘सुवर्णकाळ’ ही आगळीवेगळी योजना आखली आहे. यामध्ये अधिकचे देऊन ते तयार होईपर्यंत सोन्याचा बाजारभावातील चढउतार होऊ शकतो. सोने खरेदीचा निर्णय चुकण्याची शक्यता लागू नये, यासाठी ही योजना आहे. दागिना तयार झाल्यावर जरी सोन्याचे दर वाढले, तरी तुम्ही तेव्हा असलेल्या दराने बुकिंग केलेली रक्कम भरून दागिना घेण्याची सुविधा आहे. या उलट तुम्ही जेव्हा बुकिंग केली, त्यावेळी दर अधिक असेल व दागिने तयार झाल्यावर दर कमी झाल्यास डिलिव्हरीच्या वेळी असलेला कमी दर आकारला जाणार असल्याचे जे. के. देवी ॲण्ड सन्स ज्वेलर्सचे समीर देवी यांनी सांगितले.
ही योजना १८ ऑक्टोबरपर्यंत असली, तरी दागिन्यांची डिलिव्हरी ३० ऑक्टोबरपर्यंत घेता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन समीर देवी यांनी केले आहे.

-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com