Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! रुबी हॉलपर्यंत धावली पुणे मेट्रो

लवकरच आणखी काही स्थानकं जोडून मेट्रोचा पुढचा प्रवासही सुरु होणार आहे.
Pune Metro
Pune Metro

पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी असून पुणेकरांची मेट्रो रेल्वेनं आता रुबी हॉलपर्यंत यशस्वी धाव घेतली आहे. मुठा नदी पार करत ही मेट्रो आज रुबी हॉल स्थानकापर्यंत धावली. मेट्रोची ही चाचणी यशस्वी ठरल्यानं सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. (Good news for Punekar Pune Metro runs up to Ruby Hall)

पुणे शहरात मेट्रोची काम प्रगतीपथावर असून टप्प्याटप्प्यानं मेट्रो रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. शहरातील पहिला मेट्रो मार्ग वनाज ते रामवाडी या मार्गावर सध्या पहिल्या टप्प्यातील वनाज ते गरवारे कॉलेज मार्गावर मेट्रो सुरु आहे. त्यानंतर आजची चाचणी यशस्वी झाल्यानं लवकरच ही मेट्रो दुसऱ्या टप्प्यात लवकरच आणखी पुढच्या स्थानकांपर्यंत सुरु होण्याची आशा आहे.

Pune Metro
Kedar Jadhav's Father Missing: क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता!

दरम्यान, मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक ही ठिकाणे लवकरच मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत. आज पुणे मेट्रोची सिव्हिल कोर्ट स्थानक ते रुबी हॉल स्थानक ही चाचणी घेण्यात आली. यामध्ये ठीक ३.५० मिनिटांनी सिव्हिल कोर्ट स्थानक येथून मेट्रो ट्रेन निघाली आणि ४.०७ मिनिटांनी रुबी हॉल स्थानकात पोहोचली.

Pune Metro
Rahul Gandhi: राहुल गांधी पुन्हा अडचणीत! आता राहण्यासाठी शोधावं लागणार नवं घर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही १२ किमीची मार्गिका २०२२ मध्ये प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक-रुबी हॉल स्थानक या एकूण १२ किमीची मार्गिका लवकरच प्रवाश्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

उर्वरित कामे येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण झाल्यावर या मार्गीकांचे सीएमआरएस निरीक्षण करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांना बोलावण्यात येणार आहे. सीएमआरएस यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर या मार्गावर नियमितपणे प्रवास सुरु करता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com