पीएमपी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

PMP
PMP

पुणे - पीएमपीमधील ९ हजार ४९८ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने संचालक मंडळाच्या बैठकीत गुरुवारी दिली. दोन्ही महापालिका त्यासाठी ३२५ कोटी रुपये देणार आहेत. पीएमपीच्या संचालक मंडळाच्‍या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या प्रसंगी पिंपरीच्या महापौर उषा ढोरे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, संतोष लोंढे, आयुक्त विक्रमकुमार,राजेश पाटील, संचालक शंकर पवार, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते. मोहोळ म्हणाले, ‘‘पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश राज्य सरकारने चार वर्षांपूर्वी दिले आहेत. परंतु, तो लागू झाला नव्हता.

त्यामुळे या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली. कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१७ पासून त्याची थकबाकी मिळेल. त्यासाठी पुणे महापालिका १९५ कोटी रुपये तर, पिंपरी चिंचवड महापालिका १३० कोटी रुपये देणार आहे.’’ नव्याने कायम झालेल्या १२१४ कर्मचाऱ्यांनाही सातव्या वेतन आयोगाचा फायदा मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारच्या फेम २ योजनेतंर्गत पीएमपीने भाडेतत्त्वावर १५० ई बस घेतल्या आहेत. त्यासाठी ६३ रुपये ९५ प्रती किलोमीटर दर असेल. २५ सप्टेंबरपर्यंत ७५ तर २९ डिसेंबरपर्यंत ७५ बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील. केंद्र सरकारने यासाठी प्रती बस ५५ लाख रुपये अनुदान दिले आहे.

तसेच दोन्ही महापालिकांच्या माध्यमातून ३५० ई बस ६७ रुपये ४० पैसे भाडे प्रती किलोमीटर या दराने भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. २८ मे पर्यंत ७५, २७ जूनपर्यंत ७५, २७ जुलैपर्यंत १०० आणि २६ ऑगस्टपर्यंत १०० बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत, असेही बैठकीत निश्चित करण्यात आल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.

केंद्र सरकारचे १६ कोटी पीएमपीच्या तिजोरीत 
पीएमपीच्या ताफ्यातील ई-बसची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी प्रती बस ५५ लाख रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे पीएमपीला एकूण ८२ कोटी रुपये अनुदान मिळेल. त्यातील १६ कोटी रुपये पीएमपीच्या तिजोरीत नुकतेच जमा झाले आहेत, अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com