
नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला नारायणगाव परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नारायणगाव : नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला नारायणगाव परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता येथिल व्यापाऱ्यांनी आज बाजारपेठ बंद ठेऊन बंदला पाठिंबा व्यक्त केला. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नारायणगाव, ओतूर, आळेफाटा आज उपबजार बंद ठेवण्यात आले होते.
अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी ७ हजार विद्यार्थ्यांची सहमती
या मुळे आज टोमॅटो व भाजीपाल्याचे लिलाव झाले नाहीत. या मुळे नेहमी गजबजलेल्या येथील टोमॅटो व भाजीपाला उपबजारात व नारायणगाव बाजारपेठेत आज शुकशुकाट होता.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तीन कृषी कायदे केले आहेत.हे कायदे शेतकरी हिताचे नसून कंपनी हिताचे आहेत. कृषी कायद्यातील तरतुदी शेतकरी हिताचे रक्षण करणाऱ्या नाहीत.भविष्यात भांडवलदाराकडून शेतमालाच्या साठवणुकीचा धोका असून याचा तोटा शेतकरी व ग्राहक या दोन्ही घटकांना होणार आहे.-श्रीराम गाढवे, अध्यक्ष अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघ
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जुन्नर तालुका शेती प्रधान आहे.जुन्नर तालुक्यातील सर्व व्यापारी व शेतकरी बांधवांनी बंदला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दिला. बंद शांततेत पाळण्यात आला.-अतुल बेनके, आमदार जुन्नर