esakal | पुणे शहरात लसीकरणाला वेग; ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

Old-People-Vaccination

पुणे शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग आला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडपेक्षा पुण्यातील जास्त ज्येष्ठांनी लस घेतली असून, त्यांची संख्या २५ हजारांवर गेली आहे.

पुणे शहरात लसीकरणाला वेग; ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग आला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडपेक्षा पुण्यातील जास्त ज्येष्ठांनी लस घेतली असून, त्यांची संख्या २५ हजारांवर गेली आहे. देशाच्या तुलनेत १०.३ टक्के सक्रिय रुग्ण अद्याप जिल्ह्यात आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील लसीकरणाच्या घेतलेल्या माहितीच्या आधारावर हा निष्कर्ष निघाला. देशात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. त्याच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्करला लसीकरण सुरू आहे. त्याच वेळी आता ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्यांनाही यात लस देण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लसीकरण केंद्र ४ वरून ७१
शहरात १  मार्चपासून ज्येष्ठांचे लसीकरण सुरू झाले. त्या दिवशी शहरात फक्त चार लसीकरण केंद्रे होती. त्यात ससून रुग्णालयासह महापालिकेचे कमला नेहरू, राजीव गांधी आणि सुतार दवाखाना यांचा त्यात समावेश होता. त्या दिवशी फक्त १५४ ज्येष्ठ नागरिकांना लस देता आली. अवघ्या आठ दिवसांमध्ये या केंद्रांची संख्या ७१ पर्यंत वाढविण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. त्यात ४४ सरकारी आणि २७ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे मंगळवार (ता. ८) पर्यंत शहरात ज्येष्ठांच्या लसीकरणाचा २५ हजारांचा टप्पा ओलांडला.

गजा मारणे मिरवणूक प्रकरण : गुंड समर्थकांचं फोन रेकॉर्ड पोलिस तपासणार

लसीकरणासाठी अशी करा नावनोंदणी

 • नावनोंदणीसाठी www.cowin.gov.in यावर लॉगिन करा किंवा Cowin app वापरा
 • रजिस्ट्रेशनवर क्लिक करून मोबाईल क्रमांक टाका
 • त्यानंतर गेट ‘ओटीपी’वर क्लिक करा
 • ‘एसएमएस’च्या माध्यमातून आलेला ‘ओटीपी’ नंबर टाकून व्हेरिफाय करा
 • ‘ओटीपी’ची पडताळणी झाल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर ‘रजिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिनेशन’ पान येईल
 • यात वय आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र निवडा
 • जन्मवर्ष, लिंग, सहव्याधी असा सर्व तपशील नोंदणी करताना भरावा
 • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर माहिती दिसेल

अखेर ठरलं! पुणे विद्यापीठाची परीक्षा ११ एप्रिलपासून; नवे वेळापत्रक लवकर जाहीर होणार

अत्यावश्यक कागदपत्रे
ज्येष्ठांना आणि व्याधीग्रस्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. लसीकरणाच्या या तिसऱ्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्‍यक आहेत.     
आधार कार्ड, 
वयाचा पुरावा असलेले ओळखपत्र (जन्म दाखला, पॅन कार्ड, पारपत्र)
४५ ते  ५९ वर्षे वयातील व्याधीग्रस्त नागरिकांनी नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रमाणपत्र

बारामतीत हनीट्रॅप! बडतर्फ पोलिसांसह सातारच्या चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

लस घेतल्यानंतर हे होऊ शकते

 • हलकी डोकेदुखी
 • चक्कर येणे
 • घाम येणे
 • जडपणा
 • लाल डाग
 • सूज
 • हलका ताप

(स्रोत : आरोग्य विभाग, महापालिका)

Edited By - Prashant Patil

loading image