esakal | ... अखेर पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर सरकारी अधिकारीच प्रशासक 
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat.jpg

दोन दिवसांत ३६३ गावांचा कारभार प्रशासकांच्या हाती

... अखेर पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर सरकारी अधिकारीच प्रशासक 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरकारी अधिकारीच प्रशासकपदी नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी पाच वर्षांचा कार्यकाळ संपलेल्या 363 ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी विविध विभागातील विस्तार अधिकारी नियुक्त केले. उद्या (शनिवारी) आणखी 74 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. 

'आरटीई'च्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत    

पहिल्या टप्प्यात कृषी, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामपंचायत या चार विभागांतील विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासकपदी नियुक्त केली आहे. मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या संख्येपेक्षा या अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने प्रत्येकाकडे किमान दोन ग्रामपंचायतींची धुरा सोपविली आहे. 

येवा वाढल्याने खडकवासला धरणातील विसर्गात वाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या निवडणूक घेणे अशक्‍य आहे. शिवाय ग्रामपंचायत कायद्यातील तरतुदीनुसार विद्यमान गावकारभाऱ्यांना मुदतवाढ देता येत नाही. यामुळे राज्य सरकारने ग्रामपंचायतींवर सरकारी अधिकाऱ्यांऐवजी खासगी व्यक्तीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय वादग्रस्त ठरला होता. या निर्णयाला राज्यभरातून सुमारे 44 जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने खासगी व्यक्तीची नियुक्ती करण्यास विरोध दर्शवत, तसा अंतरिम आदेशही राज्य सरकारला दिला होता. यावर अंतिम आदेश येत्या 24 ऑगस्टला होणार आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर खासगी व्यक्ती की सरकारी अधिकारी प्रशासक होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम आता या नियुक्‍त्यांमुळे दूर झाला आहे. 

 Video : रामभक्तांसाठी आनंदाची बातमी; रामाची चलनी नोट आहे पुण्यात!

ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांत पुणे जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. यापैकी येत्या नोव्हेंबरमध्ये 42 आणि डिसेंबरमध्ये 5 अशा 47 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. या 47 ग्रामपंचायतींचा अपवाद वगळता उर्वरित 703 ग्रामपंचायतींचा कार्यकाल ऑगस्ट महिन्यातच संपत आहे. 13 ऑगस्टला सात, 20 रोजी 131 आणि 21 ला 232 ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपला. या सर्व ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी सरकारी अधिकारी नियुक्त केले आहेत. 

तारीखनिहाय मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या 
ता. 13 ः 07 
ता. 20 ः 131 
ता. 21 ः 232 
ता. 22 ः 74 
ता. 23 ः 188 
ता. 24 ः 56 
ता. 25 ः 02 
ता. 26 ः 10 
ता. 28 ः 03

loading image
go to top