
गणरायाला अभिषेक झाल्यानंतर कोश्यारींच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.
पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो...आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो, असे साकडं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दगडूशेठ गणपतीला घातलं आहे. गणरायाला महाअभिषेक करताना कोश्यारी यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार गिरीष बापट, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. गणरायाला अभिषेक झाल्यानंतर कोश्यारींच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.
Performing Abhishek pic.twitter.com/ngYXcbYl5a
— Governor of Maharashtra (@maha_governor) January 20, 2021
- टीम इंडियाच्या कसोटी विजयानंतर मोदींचा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना रिप्लाय
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, आपण सर्वांनी धर्माचे रक्षण आणि पालन केले, तर आपला परिवार, देश आणि जगाचे कल्याण होईल. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून जी सुंदर परंपरा सुरु केली आहे. ती आजही सुरु असून पुढील अनेक युगे ती सुरू राहील. आपणही त्याच मार्गाने पुढे जाऊ असे सांगत 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष देखील त्यांनी यावेळी केला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)