टीम इंडियाच्या कसोटी विजयानंतर मोदींचा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना रिप्लाय

टीम ई-सकाळ
Wednesday, 20 January 2021

मॉरिसर यांच्या या ट्विटला पंतप्रधान मोदी यांनीही रिप्लाय दिला आहे.

INDvsAUS: नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमधील क्रिकेट मॅच नेहमीच पाहण्यासारखी होते. कमालीची उत्सुकता ताणून धरलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटची मॅच शेवटच्या दिवशी ३ विकेट शिल्लक राखत भारताने जिंकली आणि ऐतिहासिक विजय साजरा केला. 

टीम इंडियाच्या या पराक्रमाची दखल ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसर यांनी देखील घेतली आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. भारताने कसोटी मालिकेत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मॉरिसर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टीम इंडियाचे अभिनंदन केलं आहे.  

'अलीबाबा'चे जॅक मा सापडले! गेल्या 2 महिन्यांपासून होते रहस्यमयरित्या बेपत्ता​
 
मॉरिसर ट्विटमध्ये म्हणतात, 'ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत जबरदस्त विजय मिळवल्याबद्दल नरेंद्र मोदी आणि भारतीय क्रिकेट टीमचे अभिनंदन. सर्वोत्तम संघ आणि खेळाडूंमध्ये ही कडवी झुंज होती.'

मॉरिसर यांच्या या ट्विटला पंतप्रधान मोदी यांनीही रिप्लाय दिला आहे. मोदी म्हणाले की, 'धन्यवाद स्कॉट मॉरिसर, ही एक रोमांचक मालिका होती. ज्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया मैदानात एकमेकांचे प्रबळ प्रतिस्पर्धी असले तरी प्रत्यक्षात मैदानाबाहेर दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 

ट्रम्प यांचं फेअरवेल स्पीच; अखेरच्या भाषणात 'US कॅपिटॉल' हिंसेचा निषेध, पुढील प्रशासनाला सदिच्छा

दरम्यान, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कमकुवत असलेल्या भारतीय संघाने गाबा स्टेडियमवर यजमान ऑस्ट्रेलियाच्या तगड्या संघाला पराभवाची चव चाखायला लावली. आणि चार सामन्यांची मालिका २-१ने जिंकली. आणि प्रतिकूल परिस्थितीत भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे कायम ठेवली आहे. 

याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियानेदेखील कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयात दाखविलेल्या धैर्य, चिकाटी आणि कौशल्याबद्दल टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. आणि बीसीसीआयचे सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. 

ट्रम्प यांचे जाता जाता नखरे; 152 वर्षानंतर पहिल्यांदाच मावळत्या राष्ट्राध्यक्षांचा असा उर्मटपणा​

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi reply Australian PM Scott Morrison on test victory​