राज्यपाल कोश्यारी यांनी दिला दहावीच्या विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र; म्हणाले...

विजय जाधव
Tuesday, 1 December 2020

सुपरमाईंड फाउंडेशनच्या वतीने राज्यातील दहावीचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यसाठी ‘गणित, विज्ञान या विषयांत अधिक गुण कसे मिळवावेत‘ विषयावर दूरस्थ परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलते होते. पुन्यासह नगर, औरंगाबाद, सातारा, बीड  इत्यादी जिल्ह्यातील जवळपास एक हजार विद्यार्थी यात सहभागी झाले होते. 

पुणे : "सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते तसेच कठोर परिश्रमामुळे प्राविण्य प्राप्त करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दहावीत गणित, विज्ञान यांसह इतर विषयात चांगली प्रगती करायची असेल त्यांनी एकलव्याप्रमाणे एकनिष्ठतेने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा," असा यशाचा मूलमंत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सुपरमाईंड फाउंडेशनच्या वतीने राज्यातील दहावीचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यसाठी ‘गणित, विज्ञान या विषयांत अधिक गुण कसे मिळवावेत‘ विषयावर दूरस्थ परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलते होते. पुन्यासह नगर, औरंगाबाद, सातारा, बीड  इत्यादी जिल्ह्यातील जवळपास एक हजार विद्यार्थी यात सहभागी झाले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या संसर्गामुळे सध्याचा काळ विद्यार्थी, शिक्षक व पालक सर्वांसाठीच कठीण झाला आहे. या विपरीत परिस्थितीत विज्ञान व गणित यांसारखे कठीण समजल्या जाणार्‍या विषयांचा अभ्यास कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन करावे, असे कोश्यारी यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, "आजचे विद्यार्थी तंत्रज्ञान-स्नेही असल्यामुळे मोबाईल फोन, संगणक या माध्यमातून ज्ञान प्राप्त करत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निसर्गदत्त बुद्धिमत्ता असते. या बुद्धिमत्तेला पैलू पाडण्याचे कार्य शिक्षक व पालकांना करावे लागते."

"कोरोनावर लस येण्यासाठी काही काळ जाणार आहे, अशावेळी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच राहिले पाहिजे. शैक्षणिक साधने नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत देखील शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक पोहोचले पाहिजे, असे मत कोश्यारी यांनी व्यक्त केले.

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

परिसंवादात माजी आमदार मेधा कुलकर्णी, सुपरमाईंड फाउंडेशनच्या संचालिका मंजूषा वैद्य, शालेय शिक्षण मंडळाच्या सदस्या डॉ. सुलभा विधाते, डॉ. जयश्री अत्रे, दया कुलकर्णी आदि सहभागी झाले होते.
 

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Governor gave the tips of success to the 10th standard students of the state