
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भोर तालुक्यातील दिवळे आणि वेळू गावातील उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून विजय उमेदवार निवडण्यात आला.
पुणे : राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडुकीचे कल हाती येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील दोन तालुक्यात उमेदवारांना समान मते पडल्याचे समोर आले आहे. मत पेटीत गावकऱ्यांनी दिलेल्या मतांची गोळाबेरीज समान झाल्यानंतर चिठ्ठी टाकून उमेदवारांची निवड करण्यात आली. भोर तालुक्यातील दिवळे आणि वेळू गावासह मुळशी तालुक्यातील एका गावात उमेदवारांना समान मते पडली.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भोर तालुक्यातील दिवळे आणि वेळू गावातील उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून विजय उमेदवार निवडण्यात आला. यामध्ये दिवळे गावातून निलेश पांगारे आणि वेळू गावातून सारिका जाधव हे निवडून आले आहेत. पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला असून केवळ एका प्रभागाची निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. मतमोजणी कक्षाबाहेर राजकीय कक्षांच्या कार्यकर्त्यांनी व इतर नागरिकांनी गर्दी केली आहे. निकाल जाहीर झाल्यावर बाहेरील संबंधित ग्रामपंचायतीचे नागरिक आनंद व्यक्त करीत आहेत.
उत्तम नियोजनामुळे मतमोजणी कक्षात ना दंगा ना गोंधळ
प्रशासनाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रात कुठलाही दंगा व गोंधळ होत नाही. मतमोजणी शांततेत सुरू असून मतमोजणी कर्मचारी आनंदाने कार्यरत आहेत. मतमोजणीसाठी प्रथमच सर्वोत्तम नियोजन झाले आहे.
Indapur Election Result 2021 : पहिल्या 37 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची जोरदार मुसंडी
प्रशासनाने मतमोजणीच्या प्रत्येक फेरीसाठी उमेदवार किंवा त्यांच्या एका प्रतिनिधी ठराविक रंगाची ओळखपत्र दिलेली आहेत. त्यामुळे एका फेरीसाठी ठराविक रंगाच्या ओळखपत्राशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही. परिणामी मतमोजणी शांततेत सुरु आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या आवारात बाहेरच पोलिसांनी कळक बंदोबस्त ठेवलेला आहे याशिवाय चौपाटी येथील मांढरदेवी मार्गावरील रस्ता अडवून अत्यावश्यक सेवेशिवाय इतर वाहनांना प्रवेश दिला नाही त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाहेर वाहनांची संख्याही तुरळक होती उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना चौपाटीपासून पायी चालत जावे लागले.
मुळशी तालुक्यातील चाले गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीतही दोन महिला उमेदवारांना समान मते पडल्याचे पाहायला मिळाले. सीमा दहीभाते यांचे नशीब उजळले. आणि त्यांना विजयी घोषीत करण्यात आले. या ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये रंजना अशोक दहीभाते आणि सीमा श्रीरंग दहीभाते या दोघी एकमेकींच्या विरोधात उभ्या होत्या. दोघीँनी मतदारापर्यंत पोचत कसून प्रचार केला. दोघींसाठीही माहेर आणि सासरकडील नातेवाईकही पळाले. त्यामुळे दोघीत कोण विजयी होणार याची ग्रामस्थांना उत्सुकता होती. तथापि मतमोजणीत दोघींनाही समसमान 176 मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार अभय चव्हाण यांनी दोघींत चिठ्ठी टाकण्याचा निर्णय घेतला. शिवन्या समीर जाधव या सहा वर्षीय चिमुरडीने एक चिठ्ठी उचलली. त्यात सीमा दहीभाते यांचे नशीब उघडले. चव्हाण यांनी त्यांच्या विजयाची घोषणा केली.