मासिक पाळीच्या नावीन्यपूर्ण कप डिझाईनसाठी ५० लाख रुपयांचे अनुदान

Pramod-Ranjan
Pramod-Ranjan

पुणे - एमआयटी विद्यापीठाच्या अटल इनक्‍युबेशन सेंटरमधील (एआयसी) प्रमोद प्रिया रंजन याला बायोटेक्‍नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असोसिएशन कौन्सिलने (बीआयआरएसी) मासिक पाळीच्या नावीन्यपूर्ण कप डिझाईनसाठी ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर  केले आहे. भारतात अशा प्रकारचे डिझाईन करण्यात येणार हे पहिले उत्पादन असेल, असा दावा करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘बीआयजी’ (बायोटेक्‍नॉलॉजी इग्निशन ग्रांट) योजनेची १६ वी सभा जानेवारी २०२० आयोजित करण्यात आली होती. यात युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (यूएनडीपी) आणि नीती आयोग यांच्या सहकार्याने युथ-को लॅब च्या राष्ट्रीय इनोव्हेटिव्ह चॅलेंज २०२० स्पर्धा घेण्यात आली. यात एमआयटी एडीटीच्या प्रमोद प्रिया रंजन याच्या डिझाईनला ५० लाख रुपयाचे अनुदान जाहीर करण्यात आले.

प्रमोद प्रिया रंजन म्हणाला, ‘‘एमआयटी इंस्टीट्युट ऑफ डिझाईनचे प्रा. डॉ. नचिकेत ठाकूर यांच्यासह रांची (झारखंड) येथे केअर फॉर्म लॅबज प्रा. लि. नावाचे स्टार्टअप आम्ही सुरू केली आहे. अनुदान कंपनीला मासिक पाळीसंदर्भातील नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या विकासासाठी देण्यात आले आहे. यासाठी गेले वर्षभर काम सुरू होते.’’ विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी या यशाबद्दल या टीममधील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) आणि नीती आयोग यांच्या सहकार्याने युथ-को लॅब च्या राष्ट्रीय इनोव्हेटिव्ह चॅलेंज २०२० स्पर्धेत देशभरातील १४ स्टार्टअपचा समावेश होता. यातून एमआयटी एआयसीच्या स्टार्टची निवड झाली आहे. या उत्पादनाचे लॉन्चिंग करण्यात येईल.
- डॉ. मोहित दुबे, सीईओ, एमआयटी एआयसी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com