मुंबई-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गाला हिरवा कंदील

वांद्रे : मुंबई-भीमाशंकर रस्त्याचे सुरू असलेले काम.
वांद्रे : मुंबई-भीमाशंकर रस्त्याचे सुरू असलेले काम.

कामशेत - मावळ तालुक्‍यातून जाणाऱ्या मुंबई-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकर सुरू होऊन भीमाशंकर तीर्थक्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल. तसेच मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठीचा वेळ वाचेल. 

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन भीमाशंकरला जाणारा मार्ग हा राष्ट्रीय दर्जाचा व्हावा, असे निवेदन दिले होते. यास कर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राची परवानगी मिळाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने खासदार कोल्हे यांना दिली आहे. भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र भाविकांचे श्रद्धास्थान असून, येथे येण्यासाठी महामार्गाची आवश्‍यकता आहे. राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने येथे पर्यटनास निश्‍चित चालना मिळेल. पर्यटनवृद्धीमुळे या भागातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सोबतच मुंबईला जाण्यासाठी वेळेची बचत होईल.

कर्जत-भीमाशंकर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यासाठी; तसेच यासंबंधी राज्यमार्ग मंत्रालय सचिव यांना कळवले आहे. महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी पत्र डॉ. कोल्हे यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे. 

मावळ तालुक्‍यातून हा रस्ता सावळा तळपेवाडीवरून भीमाशंकरकडे वांद्रेवरून; तर कोटींबेवरून मुंबई शहराकडे जाणार आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा विकासाला फायदेशीर असणारा रस्ता शेतकऱ्यांच्या शेतमालाला व दुधाला मुंबई शहरात पोचविण्यासाठी सोयीचा ठरणार आहे. जुन्नर, खेड, आंबेगावसह उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी मुंबई-पुणे-राष्ट्रीय महामार्ग किंवा यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गाने जात आहे. हा नवा मार्ग सोयीचा होईल, शिवाय वाहतुकीचा प्रश्‍न सुटेल. इतक्‍या वर्षी रेंगाळलेल्या कामाला तातडीने सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com