Corona Virus : मार्केटयार्डातील गुळ-भुसार बाजार आजपासून सुरु; फळ भाजीपाल्याचा निर्णय नाहीच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

गुरुवारी सकाळी ११ वाजता चेंबरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात आजपासूनच सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० पर्यंत बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. सध्या शहरात किरणामाला तुटवडा जाणवत होता. तो पुन्हा सुरळीत होणार आहे. तसेच नागरिकांनी मार्केट यार्डात गर्दी करू नये. जवळच्या किराणा दुकानामधूनच माल विकत घ्यावा. किरकोळ खरेदीसाठी मार्केट यार्डात नागरिकांनी येऊ नये असे आव्हान यावेळी ओस्तवाल यांनी केले.

मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभाग गुरुवार (ता. २६) पासून सुरु करण्याचा निर्णय चेंबरने घेतला आहे. मात्र अद्याप फळ-भाजीपाला विभागाबाबत अडते असोसिएशनचा कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच कामगार संघटनांची शुक्रवारी बैठक बोलवण्यात आली आहे. त्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे भुसार बाजार वगळता मार्केट यार्डातील इतर विभागाबाबत अजून निर्णय झालेला नाही.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
गुरुवारी सकाळी ११ वाजता चेंबरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात आजपासूनच सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० पर्यंत बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. सध्या शहरात किरणामाला तुटवडा जाणवत होता. तो पुन्हा सुरळीत होणार आहे. तसेच नागरिकांनी मार्केट यार्डात गर्दी करू नये. जवळच्या किराणा दुकानामधूनच माल विकत घ्यावा. किरकोळ खरेदीसाठी मार्केट यार्डात नागरिकांनी येऊ नये असे आव्हान यावेळी ओस्तवाल यांनी केले.

coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास​
गेल्या काही दिवसांपासून मार्केट यार्ड बंद बाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे शहरातील नागरिकांनी किराणा दुकानामध्ये मोठ्य गर्दी केली होती. बुधवारी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात दि पूना मर्चंटस् चेंबर, कामगार संघटना, अडते असोसिएशन आणि प्रशासक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी गर्दी कमी करून शहरातील नागरिकांना भाजीपाला आणि किराणा माल पुरवठा करण्याबाबत चर्चा झाली. तसेच कामगारांना, खरेदीदारांना ओळखपत्र देणे. इतर कोणत्याही व्यक्तीला बाजारात आवारात येण्यास मनाई करणे याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे गुळ-भुसार व्यापाऱ्यांनी गुरुवारी बैठक घेऊन बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अडते असोसिएशन आणि कामगार संघटनेचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

त्यांनी"जपली माणुसकी; लॉक डाऊन मध्येही जेवणाची सोय 

चेंबर, अडते, कामगार संघटना यांच्यासोबत गर्दी कमी करून बाजार चालू ठेवण्याबाबत बैठक झाली आहे. बाजार चालू करण्याबाबत संघटना गुरुवारी बैठका घेऊन घेऊन निर्णय घेणार आहेत. सर्व संघटना सोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे मार्केट यार्ड सुरू होईल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होईल.
- बी जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती.

Corona Virus : 5 रुपयांत मिळणार घरपोच भाजी पोळी: चंद्रकांत पाटलांची घोषणा

 
कामगार संघटनेची शुक्रवारी सकाळी बाबा आढाव यांच्या घरी बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये कामगारांनी कामावर हजर व्हायचे की नाही याबाबत निर्णय होणार आहे.
- संतोष  नांगरे, सचिव, कामगार युनियन.

अडते असोसिएशन फळ भाजीपाला विभाग बंद ठेवण्याबाबत ३१ मार्च पर्यंत ठाम आहे. पुढील दोन दिवसांमध्ये असोसिएशनची सर्वसाधारण सभा घेऊन बाजार चालू घेण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
- विलास भुजबळ, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Grocery market in the Pune market yard started today