esakal | महत्वाची बातमी : माऊली! कशी असेल आषाढी वारी?
sakal

बोलून बातमी शोधा

wari.jpg

 पुणे सातारा सोलापूर जिल्ह्यातील  सध्याचा विचार करता पालखी मार्गावरील गावांत  होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संख्या वाढत असल्याने पंढरीच्या आषाढी वारीबाबत उद्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकिकडे निर्णय काय होणार याकडे वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले आहे.

महत्वाची बातमी : माऊली! कशी असेल आषाढी वारी?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आळंदी : पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सध्याचा विचार करता पालखी मार्गावरील गावांत होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संख्या वाढत असल्याने पंढरीच्या आषाढी वारीबाबत उद्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकिकडे निर्णय काय होणार याकडे वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले आहे.
याबाबतची बैठक पुण्यातील कौन्सिल हाॅलमधे दुपारी चारला होणार आहे.

- शाळा सुरु झाल्यावर मुलांचे कसे होणार? पालकांनो, चिंता करु नका कारण...

यावेळी बैठकीला सर्व पालख्यांचे सोहळा प्रमुख तसेच मानकर्यांची भूमिका ऐकून घेवून सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असल्याने उपमुख्यमंत्री पवार यांच्या बैठकीबाबत उत्सुकता आहे.

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे आयुक्त, पिंपरी पोलिस आयुक्त संदिप बिष्णाई, पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक संदिप पाटील, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड विकास ढगे, देहू देवस्थानचे अध्यक्ष मधूकर मोरे महाराज, संत सोपानकाका विश्वस्त अॅड गोपाळ गोसावी महाराज, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी मोरे महाराज, यांच्यासोबत प्रमुख वारकरी उपस्थित असतील.

Video : चांदणी चौक येथे अॅसिड गळती; नागरिकांना डोळे चुरचुरण्याचा त्रास!  

संत सोपानदेव महाराज यांच्या पालखीच्या सोहळा प्रमुख, मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांच्या पालख्या थेट दशमीलाच पंढरपूरात प्रवेश करतील अशा स्वरूपाचे एकत्रीत निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील विश्वस्तांनी पन्नास वारक-यांसमवेत पायी चालण्याची परवानगीची मागणी केली. तर पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे  यांनी हेलिकॉप्टरने वारी करण्याचा पर्याय सुचविला आहे.

- हिंजवडी पोलिसांच्या 'त्या' मेसेजमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये परसली घबराट 

आळंदी देवस्थानने चारशे वारकरी आणि शंभर वारकरी अशा दोन पर्याय सुरूवातीला ठेवले. शक्य नसेल तर तीस वारक-यांसमवेत वाहनातून थेट दशमीला पंढरपूरात जाण्याचा तिसरा पर्याय बैठकीत बोलून दाखवला होता.

आता केवळ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्याबाबत काय निर्णय घेतला जाणार याकडे वारकरी लक्ष लावून असल्याने ऊद्याच्या बैठकीतील निर्णयाला विशेष महत्व आहे. प्राप्त परिस्थीतीनुसार शासन जो निर्णय देईल त्याप्रमाणे सोहळ्यात अंमलबजावणी केली जाईल अशी भुमिका  सर्व वारक-यांची आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा