भावकीत पेटला वाद...थेट बंदुक काढून केला गोळीबार...  

crime
crime

वेल्हे (पुणे ) : वेल्हे तालुक्यातील कोदवडी येथे भाऊकीच्या झालेल्या वादामध्ये हवेत गोळीबार झाला. या प्रकरणी परस्पर विरोधी 
तक्रार काल वेल्हे पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली असून, संबधितांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती वेल्ह्याचे सहायक 
पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांनी दिली. हि घटना २ जुलै रोजी रात्री उशिरा घडली होती. 

कोदवडी गावामध्ये बाळू शंकर माने यांच्या जमिनीमध्ये एका खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर उभारला आहे. त्याच्या तारा शेतातून ओढू नये, असे कंपनीला सांगून कामास हरकत घेतली आहे. त्याचा राग मनात धरून बाळू माने हा भावकीतील गौतम साधू माने याला शिविगाळ करीत होता. त्याचा जाब विचारण्यासाठी गौतम हा बाळू माने यांच्याकडे गेला. त्यावेळी बाळू माने व त्यांची दोन मुले अक्षय व आकाश यांनी गौतम माने यांना दमदाटी करून मारहाण केली, तर जयंद्र माने व मयूर माने हे भांडणे सोडविण्यास आली असता त्यांनाही दमदाटी व मारहाण केली. तसेच, बाळू माने याने घरातील परवाना असलेल्या सिंगल नळीच्या बंदुकीमधून हवेत एक वेळा फायर केली. याबाबतची याबाबत फिर्याद गौतम माने यांनी वेल्हे पोलिसांत दिली आहे.  

तसेच, बाळू शंकर माने यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, खासगी टॉवर उभारण्याला परवानगी दिल्याचा राग मनात ठेवून भावकीतील गौतम साधू माने, जितेंद्र लक्ष्मण माने , मयूर अंकुश माने, सचिन सुनील माने (सर्व रा. कोदवडी) यांनी गर्दी जमवून आम्हाला मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी  केली. त्यामुळे जिवीतास धोका वाटल्याने घरातील लायलन्स असलेली सिंगल बोर बंदुकीतून हवेत एक बार फायर केला.

याबाबत वेल्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com