गुंजवणी संघर्ष समिती आक्रमक; पाईप घेऊन आलेली वाहने पाठविली परत

गुंजवणी संघर्ष समिती आक्रमक; पाईप घेऊन आलेली वाहने पाठविली परत

वेल्हे (पुणे) : तालुक्यातील गुंजवणी धरणाचे पाणी हे बंद पाईपलानमधून पुंरदर तालुक्यात नेणार असून, संबधित कामाला लागणारे पाईप वेल्हे तालुक्यात दोन दिवसांपासून दाखल होत होते, असे असले तरी गुंजवणी धरणग्रस्तांचे पुर्नवसन, तालुक्यातील वांगणी, वाजेघर खोरे उपसा सिंचन योजना कशा पद्धतीने राबविणार याबाबत स्पष्टता नसल्याने गुंजवणी पाणी संघर्ष समितीचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी व नागरीक आक्रमक होत पाइप घेवून आलेली वाहने पाइप खाली न करता वेल्हे तालुक्यातून आज (ता. १) परत पाठविण्यात आली.

गेली दोन दिवसांपासून वेल्हे तालुक्यातील मार्गासनी येथे मोठ्या कंटेनरमधून पाइप उतरविण्याचे काम चालू होते, यासाठी मोठ्या क्रेन, जेसीबी, कामगार काम करत होते हे पाईप कशासाठी आले याबाबत स्थानिक नागरीक चौकशी करत असताना गुंजवणी धरणाचे पाइपलाइनचे पाइप असल्याचे स्पष्ट झाले. ही बातमी वा-यासारखी पसरल्यानंतर पाणी संघर्ष समितीचे पदाधिकरी आडवली येथील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात जमा होत आक्रमक झाले व पाईप खाली
होण्याच्या ठिकाणी जाऊन येथे आलेल्या कंटेनर पाइप खाली न उतरविता येथे आलेली कंटेनर परत पाठविले.

यावेळी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, सभापती दिनकर सरपाले, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष विष्णु  राऊत,  क्रॉंग्रेस युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर, मनसे तालुकाध्यक्ष दिगंबर चोरघे, शिवाजी चोरघे, अमोल पडवळ, अमित कोकाटे आदींसह नागरीक उपस्थित होते.

वेल्हे तालुक्यातील वांगणी खोरे व वाजेघर खो-यांना पाण्याचे वाटपाचे नियोजन कशाप्रकारे करणार असल्याची माहिती न देता संबधित ठेका असलेल्या कंपनीने पाईप उतरविले याबाबत सर्वपक्षीय पाणी संघर्ष समितीच्या वतीने निषेध व्यक्त करीत पाईपचे कंटेनर परत पाठविले -दिनकर धरपाळे, अध्यक्ष गुंजवणी पाणी संघर्ष समिती 

गुंजवणी पाण्याच्या पाईप लाईनचे सर्वे हा बदलला असुन पुर्वीच्या सर्वेप्रमाणे पाणीपुरवठा लाईन नेण्यात यावी
-दिगंबर चोरघे, अध्यक्ष वेल्हे तालका मनसे अध्यक्ष

गुंजवणी धरणग्रस्तांचे पुर्नवर्सन रखडले असून, पुंरदरमधील गायरान जमिनी प्रकल्प ग्रस्तांना मिळाव्यात.-गणपत देवगिरीकर,  गुंजवणी धरणग्रस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com