esakal | पुणे : रंगपंचमीला गालबोट; रंग लावू दिला नाही म्हणून त्याने...!
sakal

बोलून बातमी शोधा

Rang_Panchami

होळीनिमित्त क्वीन्स गार्डन परिसरातील रेसीडन्सी क्लबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कडलगी आणि त्यांचा मित्र श्रीलेश नायर या पार्टीत सहभागी झाले होते.

पुणे : रंगपंचमीला गालबोट; रंग लावू दिला नाही म्हणून त्याने...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : होळीनिमित्त शहरातील एका नामांकित क्लबमध्ये आयोजित केलेल्या पार्टीत रंग लावण्यास नकार दिल्याने तिघांनी तरुणास बेदम मारहाण करीत डोक्यात घातली. या घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघाना अटक केली.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सिंकदर अजरत शेख (वय २१), अतिक हुसेन सय्यद (वय २१), अलाबक्ष अब्दुलहमीद जमादार (वय १८), रोहन विनोद रेड्डी (वय २२, चौघे रा. केशवनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. या घटनेत जुबेर कडलगी (वय ३२, रा. कौसरबाग, कोंढवा) जखमी झाले आहेत. कडलगी यांनी यासंदर्भात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

- मोठी बातमी : पिंपरी, पुणे परिसरातील शाळा बंद; मुख्यमंत्र्यांची घोषणा

होळीनिमित्त क्वीन्स गार्डन परिसरातील रेसीडन्सी क्लबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कडलगी आणि त्यांचा मित्र श्रीलेश नायर या पार्टीत सहभागी झाले होते. त्यावेळी शेख, सैय्यद, जमादार, रेड्डी यांनी  कडलगी यांना रंग लावण्यास सुरुवात केली. कडलगी यांनी रंग खेळला होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा रंग खेळन्यास नकार दिला. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला.

- विद्यार्थ्यांनो, पुणे विद्यापीठाने प्रवेश परीक्षांबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय!

त्यानंतर चौघांनी कडलगी यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने कडलगी यांच्या डोक्यात फरशीचा तुकडा घातल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव तपास करत आहेत.

- काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात!