#GyanGanesh बुद्धीला मिळाली कष्टाची साथ अन्‌...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

समाजाच्या विविध स्तरांत आणि क्षेत्रांत बुद्धीच्या बळावर वेगळी वाट शोधून त्यात यश मिळविणाऱ्यांची काही वानवा नाही. ‘सकाळ’ने ‘ज्ञान गणेश’ सदरात प्रातिनिधीक यशोगाथा प्रसिद्ध केल्या. त्यानंतर मदतीचे शेकडो हात पुढे आले अन्‌ विधायकतेला बळ मिळाले.  

कष्टाला मिळाला न्याय 
केदार कासार (केके ट्रॅव्हल्स) -
मोठ्या लोकांच्या प्रतिक्रिया सगळेच छापतात; पण मध्यम स्तरातील उद्योजकांना प्रसिद्धी मिळत नाही. माझ्या कष्टाचा आलेख प्रसिद्ध केला आणि केलेल्या कष्टाचे चीज झाले.

‘सकाळ’ने दिली वाढदिवसाची भेट 
मीनाक्षी नार्वेकर (सीमोल) -
‘सकाळ’मध्ये १५ सप्टेंबरच्या अंकात माझा जीवनसंघर्ष प्रसिद्ध झाला आणि हजारो फोन आले. त्यादिवशीच माझा वाढदिवस होता. आठवणीत राहील, अशी भेटच ‘सकाळ’ने दिली. 

उदंड प्रतिसाद!
नवनीत मानधनी (क्‍लासचालक) -
आमचा प्रवास ‘सकाळ’ने ‘ज्ञानगणेश’ सदरात मांडून बुद्धीची आणि तेजाची पूजा केली. 

‘सकाळ’मुळे घराघरांत पोचले  
आरती देशपांडे (चपाती एक्‍स्प्रेस) -
‘सकाळ’ने महिलांच्या कष्टाची दखल घेतली. पोळ्या करणे या व्यवसायाला ‘सकाळ’ने प्रतिष्ठा मिळवून दिली. 

नंबर शोधून आले शेकडो फोन 
संजय देशमुख (माधुरी सोलर) -
सौरऊर्जेचा वापर आणि व्यवसाय मार्गदर्शनासाठी भेट घेण्याची अनेकांनी फोन नंबर शोधून इच्छा व्यक्त केली. 

सकारात्मक कार्याला बळ 
श्रीपाद घोडके (अद्विका वेल्फेअर फाउंडेशन) -
‘सकाळ’ने या कामाची दखल लाखो लोकांपर्यंत पोचविली. त्यामुळे आणखी सकारात्मक काम करण्यासाठी आम्हाला बळ मिळाले.

अवर्णनीय प्रतिसाद
रामदास माने (वायरमन ते उद्योजक) -
‘सकाळ’मध्ये मुलाखत आल्यावर मिळालेला प्रतिसाद अवर्णनीय आहे. ‘नवउद्योजकांना यापुढेही प्रोत्साहन द्या’, अशी विनंती करतो.

आता कार्य वाढेल..
अनिल वळीव (बाइक ॲम्ब्युलन्स) -
‘बाइक ॲम्ब्युलन्स’ची माहिती लोकांपर्यंत आल्यावर मदतीचे शेकडो हात पुढे आले; त्यातून एक जीव जरी वाचला तरी, त्यामागे ‘सकाळ’चे प्रयत्न असतील, असे वाटते.

मिळाला सकारात्मक प्रतिसाद
परिमल गांधी (भाषा ऑलिंपियाड) -
माझी मुलगी ऋजुलने आंतरराष्ट्रीय भाषा ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक मिळविल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर, भाषाशास्त्र हे करिअर होऊ शकते, असे दिसून आले. 

#GyanGanesh समाजातील दानशूरांना सकाळने आणले उजेडात त्या संदर्भातील सर्व बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

#GyanGanesh भाषेचे सुवर्णलेणे सातासमुद्रापार..!
#GyanGanesh जिद्द, कष्टाने उभे केले कोट्यवधींचे साम्राज्य  
#GyanGanesh रोज पस्तीस हजार पोळ्यांची "चपाती एक्‍स्प्रेस' 
#GyanGanesh "बाईक ऍम्ब्युलन्स'द्वारे दीड हजार जणांना जीवदान   
#GyanGanesh कष्टाच्या रस्त्यावर ‘के. के.’चा महामार्ग 
#GyanGanesh अवकाश विस्तारणारं दानशूर दांपत्य 
#GyanGanesh झगडताना गवसलेल्या औषधानं बदललं आयुष्य! 
#GyanGanesh : आधी तीन विद्यार्थ्यांना शिकवत होतो ; आता सहा हजार आहेत !

Web Title: GyanGanesh Representative success stories