esakal | एचए सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची दहा वर्षे हेळसांड; थकविल्या ग्रॅच्युएटीच्या रक्कमा
sakal

बोलून बातमी शोधा

HA Company fatigued ten years gratuity Amount of retired staff


एचए कंपनीच्या 250 स्वेच्छानिवृत्तीधारक कर्मचाऱ्यांना त्यांच्या ग्रॅच्युएटीसहीत बहुतेक सर्व कायदेशीर रक्कमा अदा करण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून ग्रॅच्युएटी, रजा रोखीकरण, प्रवास भत्ता आदी देणी थकवून सुमारे तीनशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तोंडाला कंपनीने पाने पुसली आहेत. 

एचए सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची दहा वर्षे हेळसांड; थकविल्या ग्रॅच्युएटीच्या रक्कमा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी: मागील दहा वर्षांपासून हिंदुस्थान एंटिबायोटिक्‍स (एचएएल) कंपनीच्या सुमारे तीनशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटी, रजा रोखीकरण आणि प्रवास भत्तांसारख्या देणींसाठी झगडावे लागत आहे. काही सेवानिवृत्त कर्मचारी त्यांच्या हक्काच्या रक्कमा मिळण्याची वाट पहातच निवर्तले आहेत. त्यामुळे, केंद्र सरकार अथवा कंपनीने थकीत देणी त्वरीत द्यावीत, अशी मागणी एचए निवृत्त कर्मचारी संघटनेने केली आहे. 

ऑनलाइन बुक केलेली नेलपेंट मिळाली म्हणून तिने...

एचए कंपनीच्या 250 स्वेच्छानिवृत्तीधारक कर्मचाऱ्यांना त्यांच्या ग्रॅच्युएटीसहीत बहुतेक सर्व कायदेशीर रक्कमा अदा करण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून ग्रॅच्युएटी, रजा रोखीकरण, प्रवास भत्ता आदी देणी थकवून सुमारे तीनशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तोंडाला कंपनीने पाने पुसली आहेत. 

अंदमान निकोबारला नेतो सांगून 24 जणांची फसवणूक 

संघटनेचे अध्यक्ष दीपक आचरेकर म्हणाले,""केंद्र सरकारने 2016 मध्ये 100 कोटी आणि 2020 मध्ये 280 कोटी रुपयांची मदत करुन देखील 2009 पासून आजतागायत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्ती पश्‍चात लाभ कंपनीने दिले नाहीत. अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वरील रक्कमांच्या प्रतिक्षेत निधन झाले आहे. तर उदर निर्वाहाचे इतर कोणतेही आर्थिक स्त्रोत नसल्याने जे कर्मचारी हयात आहेत. त्यांना विपन्न अवस्थेत जीवन जगावे लागत आहे. आमच्या संघटनेतर्फे, गेल्या दीड वर्षांपासून कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, केंद्रीय रसायन मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय यांच्याशी सातत्याने संपर्क साधूनही त्यामधून काही निष्पन्न झालेले नाही. ही सर्व कार्यालये याबाबत मूग गिळून गप्प आहेत. सगळीकडे चाल-ढकल केली जात आहे. आमचा प्रश्‍न सोडविण्याची कोणाचीही इच्छा नाही. जमीन विक्री झाल्यावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी दिली जातील असे कंपनी व्यवस्थापनाकडून वारंवार सांगितले जात आहे. परंतु, जमीन विक्रीचे घोंगडे दहा वर्षांपासून भिजत पडले आहे.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्पादन विभाग परत चालू करण्यासाठी कंपनी 600 कोटी रुपयांचे कर्ज केंद्र सरकारकडे मागत आहे. त्याऐवजी जमीन विक्री करुन 600 कोटी रुपयांचे भांडवल उभारले का जात नाही ? किंवा सरकारकडे मदत मागताना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी आणखी 50 कोटी रुपये मागण्याचे औदार्य व्यवस्थापन का दाखवित नाही ? असा सवाल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला आहे.

चिकन बिनधास्त खा, कोरोनाशी संबंध नाही!

loading image