एचए कंपनीत पुन्हा 'व्हीआरएस' लागणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

परी येथील एचए कंपनीमध्ये अलीकडच्या काळात ३१ डिसेंबर २०१९ मध्ये पहिली स्वेच्छा निवृत्ती योजना (व्हीआरएस) लागू झाली होती. त्यामध्ये, २५० कामगारांनी 'व्हीआरएस' घेतली. त्यानंतर, ३१ मार्चला दुसऱ्या टप्प्यात 'व्हीआरएस' लागू झाली. त्यात, ११६ कामगारांनी 'व्हीआरएस' स्वीकारली. येत्या काळात पुन्हा एकदा 'व्हीआरएस' लागू होण्याची अपेक्षा आहे. 
 

पिंपरी : हिंदुस्थान एंटिबायोटिक्स कंपनीत (एचए) आगामी काळात पुन्हा एकदा स्वेच्छा निवृत्ती योजना लागू केली जाणार आहे. त्याद्वारे एकूण सुमारे २०० कामगारांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचे कंपनी व्यवस्थापनाच्या विचाराधीन आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी येथील एचए कंपनीमध्ये अलीकडच्या काळात ३१ डिसेंबर २०१९ मध्ये पहिली स्वेच्छा निवृत्ती योजना (व्हीआरएस) लागू झाली होती. त्यामध्ये, २५० कामगारांनी 'व्हीआरएस' घेतली. त्यानंतर, ३१ मार्चला दुसऱ्या टप्प्यात 'व्हीआरएस' लागू झाली. त्यात, ११६ कामगारांनी 'व्हीआरएस' स्वीकारली. येत्या काळात पुन्हा एकदा 'व्हीआरएस' लागू होण्याची अपेक्षा आहे. 

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास

कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका नीरजा सराफ म्हणाल्या, "कंपनीत जादा मनुष्यबळ आहे. त्यात, विशेषतः पेनिसिलीन प्रकल्पाचा  मुख्यत्वे समावेश आहे. या प्रकल्पावर जवळपास २०० कामगार जादा आहेत. या कामगारांसाठी पुन्हा एकदा व्हीआरएस लागू केली जाईल. मात्र, त्यासाठी आम्हाला केंद्र सरकारकडून आणखी निधीची आवश्यकता आहे. तो मिळाल्यावर योजना लागू केली जाईल."
Coronavirus : लॉकडाऊनमध्येही तुम्हाला करता येणार परराज्यात प्रवास

सध्या कंपनीत सुमारे ५०० कामगार असून त्यापैकी केवळ २५० कामगारांना कायम ठेवण्याचे कंपनी व्यवस्थापनाच्या विचाराधीन आहे.

Corona Virus : पुण्यात आणखी ४ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा पोहोचला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HA company will need VRS again