अडचणीत असल्याने कर्ज घेतले, वसुलीसाठी सावकारांनी अपहरण केले; मागितली 1 कोटींची खंडणी

Hadapsar businessman Kidnap for 1 crore Ransom In Pune
Hadapsar businessman Kidnap for 1 crore Ransom In Pune

लोणी काळभोर (पुणे) : आर्थिक अडचणीत सापडलेल्या हडपसर परिसरातील एका उद्योजकाचे अपहरण करुन त्याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसापूर्वी उघडकीस आला आहे. सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील काही वर्षांपासुन बेकायदा जुगार अड्डा चालवणारा कुख्यात गुंड व त्याच्या नऊ खाजगी सावकार मित्रांनी अपहरण करुन खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अवैध धंदे चालकांचे कर्दनकाळ समजले जाणारे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या काळात, सासवड परिसरातील एका दोन नंबर धंदेवाल्याने व त्याचे मित्र असलेल्या खाजगी सावकारांनी पैशासाठी भरदिवसा एका उद्योजकाचे अपहरण करुन, त्याच्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याचे धाडस केल्याने पोलिस दलासह सर्वसामान्य नागरीकात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, भवानीप्रसाद औंदुबर तिवारी (वय ३० वर्षे, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) हे अपहरण करण्यात आलेल्या उद्योजकाचे नाव असुन, या प्रकरणी जिल्हा (ग्रामीण) पोलिसांनी विजय बाबूराव कोल्हापुरे (वय ६१ वर्षे, रा.लक्ष्मी कॉलनी हडपसर) या बेकायदा जुगार अड्ड्याच्या चालकासह, त्याचा मुलगा, रूपेश कोल्हापूरे, मित्र रविराज उर्फ पप्पु दिलीप जाधव (वय ३९ वर्षे, रा.हांडेवाडी ता .पुरंधर), नागेष परमाळे, तानाजी हाबु, स्वप्नील जगताप, जयवंत जगताप, विजय गभीरे, किरण मारूती कुंभारकर (रा. सहाही जण झेंडेवाडी ता पुरंदर), अभिषेक तापकिर (रा धनकवडी, पुणे), सागर मोकाशी, नितीन झेंडे (रा दोघेही, सासवड ता पुरंदर) व सहा अनोळखी इसम अशा सतरा जणांच्या विरोधात सासवड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार, ''स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय कोल्हापुरे याच्यासह रविराज जाधव या दोघांना अटक केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिली. या प्रकरणातील उर्वरीत आरोपींच्या अटकेसाठी पोलिस पथके रवाना झाल्याचेही घनवट यांनी यावेळी स्पष्ट केले.''

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवे घाटात विजय कोल्हापुरे व त्याचा मुलगा रुपेश हे दोघेजण मागील काही वर्षांपासुन बेकायदा पत्त्याचा जुगार चालवतात. तर या प्रकरणातील फिर्यादी भवानीप्रसाद तिवारी यांचे लोणी काळभोर, सासवड व उरुळी कांचन परिसरात विविध व्यवसाय चालू आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने एक वर्षापुर्वी विजय कोल्हापुरे व भवानीप्रसाद तिवारी यांची ओळख झाली होती. मागील काही महिन्यांपासून तिवारी आर्थिक अडचणीत आल्याने, तिवारी यांनी विजय कोल्हापुरे याच्याकडे आर्थिक मदत मिळवुन देण्यासाठी विनंती केली होती. तिवारी यांची मालमत्ता हडप करण्याच्या हेतुने विजय कोल्हापुरे याने तिवारी याची ओळख नागेश परमाळे, तानाजी हाबू, स्वप्नील जगताप, अभिषेक तापकीर, सागर मोकाशी, जयवंत जगताप, विजय गभींरे, नितीन झेंडे, किरण कुभांर या सासवड परीसरातील खाजगी सावकारांशी करुन दिली. यावर वरील नऊ जणांनी बाजारभावापेक्षा अधिक व्याजाने तिवारी यांना लाखो रुपये व्याजाने दिले होते. तिवारी यांना पैसे देतांना विजय कोल्हापुरे व त्याच्या सहकाऱ्यांनी तिवारी यांच्या नावावरील हॉटेल, जमिन व हडपसर परिसरातील दोन फ्लॅट स्वतःच्या नावावर करुन घेतले होते. 

'वशिला, शिफारस आणाल, तर बोनस मिळणार नाही!'

दरम्यान, व्याजाचे पैसे देण्यावरुन बुधवारी (ता. ११) दुपारी तिवारी व विजय कोल्हापुरे यांच्याच वाद झाला होता. या वादातून विजय कोल्हापुरे व त्याच्या समवेत आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तिवारी यांचे राहत्या घरातून बुधवारी रात्री उशीरा अपहरण केले. तिवारी यांना कोल्हापुरे यांच्या मालकीच्या सासवड घाटातील हॉटेलमध्ये नेले. त्या ठिकाणी तिवारी यांना बेदम मारहाण करुन, त्याच्याकडील सुमारे दहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून घेतले. तसेच मारहाण करतानाचा व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देत तिवारी यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडनीही कोल्हापुरे यांनी मागितली. तिवारी यांनी कोल्हापुरे यांच्याकडे गयावया करुन गुरुवारी पहाटेच्या सुमारास कसीबशी आपली सुटका करुन घेतली. हॉटेलमधुन सुटका करुन घेताच, तिवारी यांनी घ़डलेल्या घटनेची माहिती फोनवरुन ग्रामीण पोलिसांना दिली. 

दरम्यान, अपहरणाची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला आदेश मिळताच, या शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व त्याच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे तात्काळ हॉटेलवर छापा टाकून, विजय कोल्हापुरे व रविराज उर्फ पप्पु दिलीप जाधव या दोघांना ताब्यात घेतले. मात्र विजय कोल्हापुरे याचा मुलगा व त्याचे आठहून अधिक साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार होण्यात यशस्वी ठरले. पुढील तपास सासवड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अण्णासाहेब घोलप करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com