

Hadapsar Outpatient Services Closed in Protest
sakal
पुणे : हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयामध्ये नुकत्याच झालेल्या तोडफोडीच्या घटनेच्या निषेधार्थ हडपसर व आसपासच्या पंचक्रोशीतील क्लिनिक, रुग्णालये येथील सर्व बाह्यरुग्ण (ओपीडी) सेवा (तातडीच्या सेवा वगळता) मंगळवारी (ता. १६) पूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. असोसिएशनऑफ मेडिकल कन्सल्टंटच्या सचिव डॉ. रोशनी कावळे यांनी ही माहिती दिली. यामध्ये १२०० क्लिनिक व ५०० कन्सल्टंटच्या ओपीडी बंद राहतील.