esakal | हडपसर पोलिसांच्या कारवाईत चोरीच्या अकरा दुचाकींसह तरुण ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

 तरुण ताब्यात

हडपसर पोलिसांच्या कारवाईत चोरीच्या अकरा दुचाकींसह तरुण ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हडपसर : भेकराईनगर येथील तुकाईदर्शन पायथ्याला हडपसर पोलिसांनी चोरीच्या दुचाकीसह एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या अधिक तपासात एकूण अकरा दुचाकीचोरी उघड झाली असून त्याही ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.यशदीप गोविंद कोंडार (वय २२ वर्षे, रा. शिवशक्ती चौक, गंगानगर, भेकराईनगर, फुरसुंगी हडपसर. मुळ रा. चक्की नाका, कल्याण ईस्ट ठाणे) असे या तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा: दौंड : मेडीकलमध्ये चोरी, १ लाख ४५ हजार रूपयांची रोकड लंपास

गणेशोत्सव व गुन्हे प्रतिबंध अनुशंगाने वरिष्ठांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने यांच्यासह पोलीस पथकाकडून पेट्रोलिंग करण्यात येत होते. त्यावेळी ग्लायडिंग सेंटर जवळ, तुकाई दर्शन पायथ्यालगत भेकराईनगर याठिकाणी एक तरूण लाल काळ्या रंगाची हिरो होंडा पॅशन प्लस चोरीची दुचाकी गाडी घेवून उभा असल्याचे खबऱ्यामार्फत त्यांना समजले.

हेही वाचा: आंबेगाव : 11 तोळ्याची चैन चोरून फरार आरोपीस अटक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्याशी चर्चा करून पथकाने या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडे असलेली मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात त्याने हडपसरसह शहराच्या विविध ठिकाणाहून एकूण अकरा मोटारसायकली चोरल्याचे उघड झाले आहे. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.भेकराईनगर येथील तुकाईदर्शन पायथ्याला हडपसर पोलिसांनी चोरीच्या दुचाकीसह एका तरुणाला ताब्यात घेतले

loading image
go to top